News Flash

संजू बाबाची आमिरसोबतची टक्कर टळली, ‘भूमी’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत फेरबदल

संजय दत्तने खुद्द चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्याची विनंती केली होती.

संजय दत्त आगामी 'भूमी' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमनास सज्ज झाला आहे.

बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त आगामी ‘भूमी’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावरील पुनरागमनासाठी सज्ज झालाय. पण, संजूबाबाच्या भेटीसाठी त्याच्या चाहत्यांना आणखी काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण, त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेत बदल करण्यात आला आहे. त्याचा हा चित्रपट आता २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या निर्णयामुळे बॉक्स ऑफिसवर संजू बाबा आणि आमिर खान यांच्यातील टक्कर टळली आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित ‘भूमी’ हा चित्रपट ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र, याचवेळी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आमिरसोबत ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आमिर खानच्या चित्रपटाचा आपल्या आगामी  ‘भूमी’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फटका बसू नये, यासाठी खुद्द संजय दत्तने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्याची विनंती निर्माता आणि दिग्दर्शकांना केली होती. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांच्यासह निर्माते भूषण कुमार आणि संदीप सिंग यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला.

संजूबाबाच्या आगामी चित्रपटाचे कथानक हे वडील आणि मुलीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरी संजयच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. ओमंग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’ आणि ‘सरबजीत’ सारखे सरस चित्रपट दिले असून त्यांच्या दिग्दर्शनात संजय दत्तच्या दमदार पुनरागमनाची अपेक्षा तमाम सिनेरसिकांना आहे. त्यामुळे ‘भूमी’ चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेतील बदलानंतर बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे निश्चितच उत्सुकतेचे ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 11:02 am

Web Title: bhoomi sanjay dutt comeback film postponed to avoid any box office clash release on september 22
Next Stories
1 तंत्राचे बाहुबळ..
2 डोंबिवलीचा ‘बाहुबली’
3 ‘मला काहीतरी वेगळं सांगायला आवडतं’
Just Now!
X