08 December 2019

News Flash

भूमी पेडणेकर करते ‘या’ अभिनेत्याला डेट?

भूमी लवकरच 'सांड की ऑंख' या चित्रपटात दिसणार आहे

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट- रणबीर कपूर, सुशांत सिंग राजपूत- रिया चक्रवर्ती, कार्तिक आर्यन – सारा अली खान यांच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव सामिल करण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार भूमी पेडणेकर आणि जॅकी भगनानीचे ऐकमेकांवर प्रेम आहे. बराच वेळा भूमी जिमवरुन निघाल्यावर जॅकीच्या गाडीत बसून घरी जाते. त्यामुळे भूमी आणि जॅकीच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

यापूर्वी जॅकीचे नाव टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरासह जोडण्यात आले होते. सध्या भूमी तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी भूमी तिचा चित्रपट ‘पती पत्नी और वो’च्या चित्रीकरणासाठी लखनऊला रवाना झाली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन, अनन्या पांडेदेखील मुख्य भूमीकेत दिसणार आहेत. त्यानंतर भूमी ‘सांड की ऑंख’ या चित्रपटात दिसणार आहे.

जॅकीचा काही दिवसांपूर्वी ‘मित्रो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. त्यानंतर त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याल सुरुवात केली. त्याने ‘मोहिनी’ या तामिळ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.

First Published on August 14, 2019 7:39 pm

Web Title: bhumi pednekar affair avb 95
Just Now!
X