News Flash

नेटकऱ्यांनी मावशीसाठी बेड मिळवून देण्यास केली मदत, भूमी पेडणेकरने मानले आभार

भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर पोस्ट करत मदत मागितली होती.

देशात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर पोस्ट करत मावशीसाठी व्हेंटिलेटर बेड हवा असल्याचे सांगितले.

भूमीने तिच्या ट्वीटर हॅंडलवरून हे ट्वीट केले आहे. “हे दिवस दिवसेंदिवस कठीण होत आहेत. मला दिल्ली एनसीआरमध्ये माझ्या मावशीसाठी व्हेंटिलेटर बेड पाहिजे. ती आयसीयूमध्ये आहे पण आम्हाला त्वरितच तिची बदली करायची गरज आहे. जर कोणाला काही माहित असेल तर कृपया मला मेसेज करा,” अशा आशयाचे ट्वीट भूमीने केले होते.

 

त्याच्या काही क्षणातच नेटकऱ्यांनी तिला मदत केली. भूमी म्हणाली, “माझ्या ट्विटर कुंटुंबाचे आभार, माझ्या मावशीला मदत मिळाली. मला मेसेज करुन माहिती दिलेल्या प्रत्येकाचे आभार. गेल्या ३ आठवड्यात घडलेल्या सर्व गोष्टींनी भारावून गेली आहे. आभार मानते. पुन्हा एकदा लोकांना मदत करायला सुरु करुया.” अशा आशयाचे ट्वीट करत भूमीने नेटकऱ्यांचे आभार मानले आहे.

दरम्यान, भूमीला एप्रिल महिन्यात करोनाची लागण झाली होती. मात्र, होम क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्याच तिची करोना चाचणी ही निगेटिव्ह आली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 10:08 am

Web Title: bhumi pednekar aunt need ventilator and actress thanks to twitter family for help dcp 98
Next Stories
1 “ते निर्माते कलाकारांना आपल्या तालावर नाचवत आहेत”; रवीना टंडनचा खुलासा
2 करोना रूग्णांच्या मदतीसाठी अभिनेत्री आलिया भट्ट पुढे सरसावली
3 शुभ्राच्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती
Just Now!
X