News Flash

भूमीने शेअर केले सुशांतचे फोटो; जुन्या आठवणींना उजाळा

'सोनचिरिया' सिनेमाच्या सेटवरचे सुशांतचे न पाहिलेले फोटो

अभिनेत्री भूमी पेडणेकरने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूरसोबतचे काही जुने फोटो शेअर करत सुशांतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. सुशांतचं हुशार व्यक्तिमत्व पिढ्यांपिढ्या लक्षात राहिलं असं म्हणत भूमीने सुशांतच्या आठवणी ताज्या केल्या.

1 मार्चला भूमी आणि सुशांतच्या ‘सोनचिरिया’ या सिनेमाने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. याच निमित्ताने भूमीने या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचे सुशांत आणि संपूर्ण टीमसोबतचे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिषेक चौबे दिग्दर्शित या सिनेमात चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांचं जीवन तिथली परिस्थिती रेखाटण्यात आली होती. या सिनेमात सुशांतने लखना ही भूमिका साकारली होती. हा सिनेमा हिट ठरला नसला तरी सिनेमातील सुशांतची भूमिका चांगलीच गाजली होती.

भूमीने या सिनेमाच्या सेटवरचे सुशांतचे कधीही न पाहिलेले अनेक फोटो शेअर केले आहेत. यात भूमीने म्हंटलंय ” मला हे सांगून संपवायचंय की आम्हाला सुशांतची खूप आठवण येते. मला आठवतंय की सिनेमाच्या स्क्रिनिंगनंतर आम्हा दोघांनाही अश्रू आवरणं कठिण झालं होतं. या सिनेमाचा भाग होणं हे आमच्यासाठी खूप भाग्याचं होतं आणि सिनेमाने देखील आम्हाला खूप काही दिलं. विशेष म्हणजे एक कुटुंब आणि सुंदर अनुभव” असं भूमीने सांगितलं.

पुढे भूमी म्हणालीय “शिवाय हा आपला सर्वात कठीण पण बरचं काही शिकवणारा अनुभव होता. लखना म्हणून तू निभावलेली सर्वोत्तम भूमिका पुढच्या पिढीच्याही लक्षात राहिल मित्रा.” असं लिहीत भूमी भावुक झाली.
‘सोनचिरिया’ सिनेमात चंबळ खोऱ्यातील वस्तूस्थिती मांडण्यात आली होती. तसचं इथल्या जातीवादावर आणि पितृसत्ताक व्यवस्थेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:45 pm

Web Title: bhumi pednekar shares sushant sing rajputs old photo from movie sonchiriya kpw 89
Next Stories
1 दीपिका पदूकोणचं डेली रुटीन काय असेल? चला जाणून घेऊया
2 राहुल गांधींनी स्वीकारलं पुशअप्स चॅलेंज, स्वरा भास्कर म्हणाली…
3 सुनील शेट्टीच्या मुलाचं होणार मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण
Just Now!
X