07 March 2021

News Flash

भूमी पेडणेकरचा युनेस्कोला पाठिंबा

मासिक पाळीबद्दल जागृती करणाऱ्या व मुलींना शिक्षण देणाऱ्या या चळवळीसोबत करणार काम

अभिनेत्री भूमी पेडणेकर नवनवीन आणि वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आत्तापर्यंत तिने शुभमंगल सावधान, दम लगा के हैशा, बाला, टॉयलेट अशा समाजात उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयांवरचे चित्रपट केले आहेत. रिल आयुष्याप्रमाणे रिअल आयुष्यातही भूमी अशा महत्त्वाच्या विषयांवर बोलताना दिसत आहे.

आयएएनएस या माध्यमसंस्थेच्या वृत्तानुसार, नुकतंच तिने मासिक पाळीच्या दिवसादरम्यानच्या स्वच्छतेबद्दल मुलींमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठीच्या युनेस्कोच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. युनेस्को आणि महिलांसाठीच्या एका नामवंत ब्रँडने एकत्र येत #KeepGirlsInSchool ही चळवळ सुरु केली आहे. केवळ मासिक पाळीबद्दलच्या अज्ञानामुळे मुलींची शाळा बंद होणं आणि त्यांच्या स्वप्नांवर बंधनं येणं चुकीचं आहे. यासाठी मासिक पाळीबद्दल जागृती करणाऱ्या आणि मुलींना शिक्षण देणाऱ्या या चळवळीसोबत आपण काम करत असल्याचं भूमी म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

तसंच या चळवळीत आपलं योगदान देण्याचं आवाहनही तिने सर्वांना केलं आहे. मासिक पाळी ही गोष्ट नॉर्मल करून त्याबदद्ल मुलींना, महिलांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे. केवळ या कारणासाठी मुलींची शाळा सुटू नये असं मतही तिनं व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 2:52 pm

Web Title: bhumi pednekar supports unesco vk98
Next Stories
1 …म्हणून सई-प्रसाद करणार नाहीत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं परीक्षण
2 ‘तिची आई काय काम करते?’, ट्रोल करणाऱ्याला नव्याचे सडेतोड उत्तर
3 बालिका वधूचं स्वप्न पूर्ण, तेलगू सिनेमाची निर्मिती
Just Now!
X