अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत असलेला ‘दुर्गामती’ हा चित्रपट आज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भागमती’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात भूमी एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत भूमीने तिला कोणत्या चित्रपटातील भूमिका साकारायला आवडली असती याचा खुलासा केला आहे.

भूमीने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये तिला असा कोणता चित्रपट आहे त्यामध्ये भूमिका साकारण्याची इच्छा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भूमीने उत्तर देत कोणत्या अभिनेत्रीची नाही तर एका अभिनेत्याची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता रणवीर सिंग आहे. त्याची एका चित्रपटातील भूमिका साकारण्याची इच्छा भूमीने व्यक्त केली आहे. रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला होता. भूमीला रणवीरची गली बॉय या चित्रपटातली भूमिका साकारण्याची इच्छा आहे. कारण तिला हा चित्रपट प्रचंड आवडला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

‘गली बॉय हा चित्रपट मला प्रचंड आवडला होता. तो पाहताना मला आनंद झाला होता. त्या चित्रपटातील रणवीरची भूमिका मला साकारायला आवडेल’ असे भूमि म्हणाली होती. या मुलाखतीमध्ये भूमिने तिचा ‘दुर्गामती’ हा चित्रपट शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे.

दरम्यान, ‘दुर्गामती’ या चित्रपटात भूमीसोबत अर्शद वारसी, माही गिल, करण कपाडिया आणि जिशू सेनगुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘दुर्गामती’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आज प्रदर्शित झाला आहे.