06 July 2020

News Flash

‘मिस मॅच’ सिनेमात एक फ्रेश जोडी !

भूषण प्रधान आणि मृण्मयी कोळवलकर ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश वसईकर यांनी केले आहे.

| October 7, 2014 02:40 am

मराठी चित्रपटांमध्ये सध्या अनेक नवनवीन चेहरे पहायला मिळत आहेत. ‘गोल्ड कॉईन एंन्टरटेण्मेंट’ च्या आलोक श्रीवास्तवा यांची निर्मिती असलेला आणि यु. के. फिल्म्सच्या रेहबर खान यांची प्रस्तुती असलेल्या ‘मिस मॅच’ चित्रपटात मृण्मयी कोलवालकर हा नवा चेहरा आपल्या भेटीस येणार आहे. मृण्मयीने याआधी लॉरेल, गार्डन सारीज, दिनेश सुटिंगस यासाठी मॉडेल म्हणून काम केले असून ‘मिस मॅच’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात भूषण प्रधान आणि मृण्मयी कोळवलकर ही फ्रेश जोडी आपल्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश वसईकर यांनी केले आहे.
‘मिस मॅच’ ची कथा आहे ती एका श्रीमंत घराण्यातील बिझनेसमनच्या मुलीची. आपल्या मुलीचे लग्न हे आपल्या पसंतीच्या तसेच श्रीमंत घराण्यातील अशा मुलाशी व्हावे अशी वडिलांची इच्छा असते. परंतु अरेंज मॅरेज वर आपला विश्वास नसल्याने आपण स्वतःच आपल्या पसंतीचा मुलगा शोधणार आणि त्याच्याशीच लग्न करणार असा हट्ट त्याच्या असतो. यासाठी ती मुलगी वडिलांकडून दोन वर्षाचा कालावधी घेते. या दोन वर्षात तिला तिच्या पसंतीचा नवरा मिळतो का ? की ती अरेंज मॅरेज करते? या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘मिस मॅच’ हा चित्रपट पाहावा लागणार आहे.
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, बेला शेंडे, हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते यांच्या सुमधुर आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. अभिनेता भूषण प्रधान, मृण्मयी कोलवालकर यांच्यासोबत उदय टिकेकर, भाऊ कदम, जयवंत भालेकर यांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
येत्या नोव्हेंबर महिन्यात ‘मिस मॅच’ सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे.     
miss-match-450
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2014 2:40 am

Web Title: bhushan pradhan and mrunamayi kolvalkar in miss match marathi movie
Next Stories
1 मराठा मंदिर करणार ‘डीडीएलजे’ला अलविदा!
2 CELEBRITY BLOG : अशा (अ)मंगळाचं काय..?
3 ‘ग्लोबल डाइव्हर्सिटी पुरस्कारा’ने किंग खानचा गौरव
Just Now!
X