15 December 2019

News Flash

‘तू तिथे असावे’मध्ये झळकणार भूषण व पल्लवीची जोडी

आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही

पल्लवी पाटील, भूषण प्रधान

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अशीच एक हटके जोडी ‘तू तिथे असावे’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघं या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा आणि जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी कुमार पाटील एण्टरटेन्मेन्टची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

वाचा : ‘गोलमाल अगेन’मध्ये ‘बिइंग ह्युमन’

जगण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी व्यक्त केला. आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही अशावेळी हताश न होता आयुष्य कसं जगावं या सर्व गोष्टींवर भाष्य करणारा एका वेगळ्या विषयाचा चित्रपट म्हणजे ‘तू तिथे असावे’.

वाचा : कंगनासोबतच्या नात्यावर अखेर हृतिक बोलला

भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचं आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहीतोष सरदारे आहेत.

First Published on October 5, 2017 6:06 pm

Web Title: bhushan pradhan and pallavi patil will seen in tu tithe asave movie
Just Now!
X