News Flash

भूषण प्रधान ‘कॅान्ट्रॅक्ट मॅरेज’ घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटाद्वारे स्वतंत्र गोएल करणार दिग्दर्शनात पदार्पण

अभिनेता भूषण प्रधान मुख्य भूमिकेत असणारा ‘कॅान्ट्रॅक्ट मॅरेज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते स्वतंत्र उर्फ सॅव्ही गोएल दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

‘कॅान्ट्रॅक्ट मॅरेज’ या मराठी सिनेमात भूषण प्रधानसोबत नेहा महाजन, दिप्ती धोत्रे, स्वाती कार्णेकर, प्रसाद ओझरकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. दुष्यंत दुबे आणि किर्ती किल्लेदार यांनी या सिनेमाला संगीत दिलं आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन सॅव्ही यांनीच केलं असून, सवीना क्रिएशन या बॅनरखाली त्यांनी ‘कॅान्ट्रॅक्ट मॅरेज’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम वेगात सुरू आहे. याशिवाय या सिनेमाबाबतच्या काही गोष्टी सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.

सॅव्ही हे बॅालिवूडमधील एकमेव असे निर्माते आहेत, ज्यांनी केवळ पाच वर्षांच्या काळात पाच चित्रपट बनवले आहेत. पंजाबमधील पटियालामध्ये जन्मलेल्या गोएल यांचं बालपण तिथेच गेलं आहे. महाविद्यालयीन दिवसांपासूनच गोएल यांना थिएटरमध्ये रूची होती आणि तिथे ते अॅक्टीव्हही होते. २०१४ मध्ये त्यांनी आपलं स्वप्न साकार करत बॅालिवूडमध्ये एंट्री केली. लवकरच त्यांचा ‘कॅान्ट्रॅक्ट मॅरेज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 5:02 pm

Web Title: bhushan pradhan conract marriage avb 95
Next Stories
1 अनिल कपूरच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेत
2 लग्नाच्या ३ महिन्यानंतर गौहर खान प्रेग्नंट?, अभिनेत्रीने केला खुलासा
3 २०२४मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार, कंगना रणौतने केलं ट्विट
Just Now!
X