मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम हंक म्हणजेच अभिनेता भूषण प्रधान. उत्तम अभिनयासोबतच भूषणच्या एका स्माइलवर अनेक तरुणी घायाळ होतात. त्यामुळे भूषणची तरुणींमध्ये तुफान क्रेझ आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा अभिनेता मात्र, एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याचं सांगण्यात येत आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे.
‘घाडगे & सून’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये साऱ्यांनाच ठावूक असले. अत्यंत गुणी आणि सालस अभिनेत्री म्हणून खासकरुन भाग्यश्रीकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे याच भाग्यश्रीला भूषण डेट करत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.अलिकडेच भाग्यश्रीचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने भूषणने तिच्यासोबत एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली.
View this post on Instagram
‘मी किती खास आहे याची जाणीव तू मला कसं करून देते हे वर्णन करण्यासाठी कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. तू जशी आहेस तशीच राहा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा,’ अशी पोस्ट भूषणने लिहिली. त्यावर ‘..आणि तू नेहमीच माझा दिवस खास बनवतोस’, अशी प्रतिक्रिया भाग्यश्रीने दिली.
दरम्यान, यापूर्वीदेखील भाग्यश्री आणि भूषण यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र, या दोघांनीही याविषयी मौन बाळगलं आहे. भूषण प्रधान हा मराठीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याने चित्रपटांसोबत वेब सीरिजमध्येदेखील काम केलं आहे. ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘सतरंगी रे’, ‘मिस मॅच’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलंय. काही दिवसांपूर्वीच भूषणने ‘सर्वांत आकर्षक पुरुष’चा किताब जिंकला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2020 9:16 am