News Flash

YouTube स्टार भुवन बामच्या आई-वडिलांचे करोनामुळे निधन

भुवन बामने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

bhuvan bam parents passes away due to coronavirus
आई-वडिलांसोबत भुवन बाम

भारतात करोनाव्हायरसने भयंकर स्थिती निर्माण केली असून अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावावे लागले आहे. सामान्य व्यक्तींपासून नामवंत व्यक्तींपर्यंत हा व्हायरस पोहोचला आहे. अशातच लोकप्रिय यू ट्यूबर भुवन बाम याच्याही आई-वडिलांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. भुवन बामने इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर ही माहिती दिली.

भुवन बामने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पालकांसोबतचे फोटो शेअर केले. ”कोविडमुळे मी माझ्या पालकांना गमावले आहे. आई आणि बाबांशिवाय काहीही पहिल्यासारखे राहिलेले नाही. एका महिन्यात सर्व उद्ध्वस्त झाले. घर, स्वप्ने, सर्व काही. माझी आई माझ्याजवळ नाही, माझे बाबा माझ्याजवळ नाहीत. आता मला सुरुवातीपासूनच जगायला शिकावे लागेल. पण तसे करावेसे वाटत नाही.”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhuvan Bam (@bhuvan.bam22)

”मी चांगला मुलगा होतो का? मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व काही केले का? मला आता या प्रश्नांसह कायमचे जगावे लागेल. मी त्यांना पुन्हा पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. मी प्रार्थना करतो, की तो दिवस लवकरच येईल”, असेही भुवन बाम पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर, त्याच्या चाहत्यांसह सर्वांनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ‘‘माझ्या नवऱ्याला असे कृत्य करण्यास भाग पाडले गेले, यामागे षडयंत्र आहे”

२०२०मध्ये भुवन बामलाही करोनाची लागणही झाली होती. सोशल मीडियावर त्याने याबाबत सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 10:23 pm

Web Title: bhuvan bam parents passes away due to coronavirus adn 96
Next Stories
1 करोना मातेची मास्क लावलेली मूर्ती आणि दर्शनासाठी ग्रामस्थांची रांग; मातेचा आवडता रंग पिवळा!
2 लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकीय शक्ती निर्माण झाली; नगरसेविका फडणवीस यांचा दावा
3 pulitzer prize 2021 : चीनचा केला पर्दाफाश! भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव
Just Now!
X