18 January 2021

News Flash

“आता तरी देशातील मूळ समस्यांवर लक्ष द्याल का?”; रियाच्या अटकेनंतर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली आहे. अंमली पदार्थ खरेदी व सेवन करण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर बॉलिवूड अभिनेत्री बिदिता बाग हिने प्रतिक्रिया दिली आहे. रिया चक्रवर्तीला अखेर अटक झाली. कृपया आता तरी देशातील महत्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करावं. ज्यांचा सामना आपला देश करतोय. अशा आशयाचं ट्विट बिदिताने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “आता खरी माहिती बाहेर पडेल”; सुशांत प्रकरणावर वकिल विकास सिंह यांची प्रतिक्रिया

यापूर्वी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. रिया चक्रवर्ती ही कुटुंबातील ही दुसरी अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 4:52 pm

Web Title: bidita bag on rhea chakravarthi arrested by ncb mppg 94
Next Stories
1 रियाला अटक : “न्यायाची थट्टा चालवली आहे, तीन केंद्रीय यंत्रणा एका महिलेची…”
2 “काही लोक स्वत:ला शेरलॉक होम्स समजतात”; आणखी एका अभिनेत्रीचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा
3 अक्षयची पत्नी मोठी स्टार का नाही? ट्विंकलने मीम्स शेअर करत सांगितलं कारण
Just Now!
X