बॉलिवूडमधील सुपरहिट जोड्यांपैकी एक म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची जोडी. बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. त्यांच्या जोडीला कायमच प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच बिग अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासोबत केलेल्या पहिल्या सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळ्या पोस्ट ते शेअर करत असतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच ‘बंसी और बिरजू’ या त्यांच्या सिनेमातील जया बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय. या सिनेमात पहिल्यांदा बिग बी आणि जया बच्चन एकत्र झळकले होते. हा सिनेमा एक सप्टेंबर १०७० सालामध्ये रिलीज झाला होता.

Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
panvel sujay vikhe marathi news, nilesh lanke marathi news
डॉ. सुजय यांच्या सभेत ऐकविलेली ती ध्वनीफीत बनावट – निलेश लंके
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”
Delhi Rape case
दिल्लीत चार वर्षांच्या मुलीवर ३४ वर्षीय तरुणाकडून बलात्कार, पांडव नगरमध्ये तोडफोड आणि तणाव

हे देखील वाचा: नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ता यांचा रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

अमिताभ बच्चन यांनी ‘बंसी और बिरजू’ सिनेमातील एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांना मिठीत घेतल्याचं दिसतंय. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ” आपण दोघांनी एकत्र काम केलेला पहिला सिनेमा ‘बंसी और बिरजू’. १ सप्टेंबर १९७० सालामध्ये ४९ वर्षांपूर्वी रिलीज झाला होता”.

हे देखली वाचा: श्वेता तिवारीला लेक देतेय टक्कर, पलकच्या मादक अदांवर नेटकरी घायाळ

‘बंसी और बिरजू’ सिनेमाला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. या सिनेमानंतर बिग बी आणि जया बच्चन ‘एक नजर’ या सिनेमात एकत्र झळकले होते. या फोटोला बिग बींची नात नव्या नंदा तसचं अभिनेचा रितेश देशमुख यांनी कमेंट बॉस्कमध्ये इमोजी देत पसंती दिली आहे.

तर १९७३ सालामध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि जया लग्नबंधनात अडकले. त्यानंतर बिग बी आणि जया बच्चन यांची जोडी ने ‘अभिमान’, ‘चुपके चुपके’, ‘मिली’, ‘शोले’ आणि ‘सिलसिला’ यासारख्या अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकली.