काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्यावर शस्रक्रिया करण्यात आली होती. बिग बींनी सोशल मीडियावरुन या शस्त्रक्रियेबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. तर शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचंदेखील त्यांनी कळवलं होतं.

नुकतच अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करत त्यांच्या दुसऱ्या डोळ्यावर देखील शस्त्रक्रिया झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. आयुष्य बदलणारा अनुभव असल्याचं ते म्हणाले आहेत. ” आणि दुसरीदेखील चांगली पार पडली…बरा होतोय. आता सर्व ठिक आहे..वैदकिय तंत्रज्ञानातील चमत्कार आणि डॉक्टरांचं कौशल्य.. आयुष्य बलणारा अनुभव.. तुम्ही आता ते पाहू शकता जे आधी पाहण कठिण होतं.. अर्थातच सुंदर जग!!” अशा आशयाचं ट्विट बिग बी यांनी केलंय.

डोळ्यांवरील यशस्वी शस्त्रक्रियेमुळे त्यांना सुंदर जग पाहणं कसं शक्य झालं याबद्दल बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहलं आहे. ” अद्भूत जग..आतापर्यंत काय चुकलंय ते पहाण्यासाठी .. रंग, आकार..एक आयुष्य बदलणारा अनुभव ..असं म्हणत त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

या शस्त्रक्रियेला उशीर झाल्यास अंधत्व येऊ शकलं असंत असही ते म्हणाले आहेत. “त्यामुळे एक सल्ला आहे खूप उशीर होण्यापूर्वी उपचार घेणं योग्य” असं ते म्हणाले आहेत. यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांनी आपल्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचेही आभार मानले, “तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल तुमचे सर्वांचे आभार. मला हे समजून आनंद होतोय कि तुम्ही माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहात” असं ते म्हणाले. बिग बी लवकर ‘चेहरे’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.