News Flash

बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

श्वेता नंदाच्या वाढदिवसानिमित्तानं

बॉलिवूडचे शेहनशहा बिग बी अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली आहे. या शस्त्रक्रियेनंतर बिग बींनी एक पोस्ट शेअर करत प्रकृती उत्तम असून शस्रक्रिया यशस्वी पार पडल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं. बिग बी कायमच सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात असतात.

नुकतेच बिग बींनी मुलगी श्वेता नंदा सोबतचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. श्वेता नंदाच्या  वाढदिवसानिमित्ताने बिंग बी यांनी फोटो शेअर करत लाडक्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्यांनी श्वेताचे काही जुने फोटोदेखील शेअर केले आहेत. “मुली कायमच बेस्ट असतात” असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक दिले आहेत. तसचं अनेकांनी कमेंट करत श्वेता नंदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांची मुलगी असूनही श्वेता अभिनय बॉलिवूडपासून दूर का असा सवाल श्वेताला अनेकदा विचारण्यात आला. मात्र लहानपणापासूनच श्वेताला अभिनय क्षेत्राचं आणि बॉलिवूडचं आकर्षण नव्हतं. श्वेता एक लेखिका आहे. अनेक दिवस श्वेताने डीएनए या वत्तपत्रासाठी स्तंभ लेखन केलं आहे. यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला होता.

श्वेताने शूटींग आणि अभिनयापासून दूर जाण्याबद्दलचा एक अनुभव तिच्या लेखनातून मांडला होता. लहान असताना श्वेता कायम शूटिंग पाहण्य़ासाठी सेटवर जात असतं. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन अनेकदा शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांना फारसा वेळ मिळत नसे. त्यामुळे श्वेताच त्यांना भेटण्यासाठी सेटवर जात. एके दिवशी श्वेता बिग बींच्या मेकअप रुममध्ये खेळत होती. तिथं असलेल्या स्कॉकेटमध्ये तिचं बोट अडकलं. तिथं पासून श्वेताने सेटवर जाणं सोडलं आणि एकाप्रकारे बॉलिवूडशी तिचा संबध तुटला.

असं असलं तरी शालेय दिवसांमध्ये श्वेताने काही नाटकांमध्ये काम केलंय. इथंही श्वेतला वाईट अनुभव आला. एका नाटकात श्वेताने भाग घेतला होता. नाटकातील संवादांचा तिने चांगला सरावही केला होता. मात्र स्टेजवरच नेमका ती तिचा डायलॉग विसरली. त्यामुळे श्वेताचा पुरता भ्रमनिरास झाला आणि तिने अभिनयाकडे कायमची पाठ वळवली.

श्वेता नंदाने अभिनयाचा वारसा पुढे नेला नसला तरी तिने आजोबांचा लेखनाचा वारसा कायम ठेवला आहे. एक उत्तम लेखिका म्हणून ती नावारुपाला आली.बिग बी अमिताभ बच्चन यांनी कायमच श्वेताचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत. कुटुंबातील स्त्रीयांना ते कायम आदर देत असल्याचं दिसून आलंय. नुकताच पार पडलेल्या महिलादिनाला देखईल त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणा देणाऱ्या स्त्रीयांचा एक फोटो शेअर केला होता. यात त्यांनी श्वेताचा फोटोही पोस्ट केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 8:57 am

Web Title: big b amitabh bachachan wish her daughter shweta nanda on her birthday know more about her kpw 89
Next Stories
1 ३२ लाखांची घड्याळ, १.७ लाखाचा ड्रेस प्रियांकाच्या ऑस्कर लूकने वेधल सगळ्यांच लक्ष
2 अक्षय कुमार जाणार अयोध्येमध्ये; जाणून घ्या काय आहे कारण?
3 म्हणून माझ्या बायोपिकमध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारावी, राखी सावंतने व्यक्त केली इच्छा
Just Now!
X