27 October 2020

News Flash

#Happy Birthday Amitabh Bachchan: ‘बिग बीं’चं खरं नाव माहित आहे का ?

'भुवन शॉ', 'सात हिंदुस्तानी' हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते.

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ७६ वा वाढदिवस. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय चित्रपटातील ‘अॅग्री यंग मॅन’ अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.

११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग बी यांचा जन्म झाला. जन्मापूर्वी त्यांचे नाव इन्कलाब श्रीवास्तव असे होते. परंतु त्यांचं हे नाव बदलून अमिताभ असं ठेवण्यात आलं. अमिताभ म्हणजे असा प्रकाश जो कधीही कमी होत नाही. त्यामुळे बिग बींचं अमिताभ हे नामकरण करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांच्या आईमुळे त्यांची पावलं रंगभूमीकडे वळली आणि याच जोरावर ते मुंबईमध्ये आले. या कालावधीमध्ये त्यांना वडीलांकडून साहित्याचाही मोठा वारसा मिळाला होता.

अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे त्यांच्या कारकीर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले. या सगळ्या चित्रपटांमधून वेळोवेळी बदलती समाजव्यवस्था, राजकारण, समाजकारण, आणि वाढती गुन्हेगारी याचे चित्रण झाले. त्यामुळे अमिताभ हिंदी चित्रपटसृष्टीतील एका नव्या प्रवाहाला निमित्त ठरले. ‘चुपके-चुपके’, ‘नमक-हलाल’, ‘मिली’सारखे वेगळे चित्रपटही त्यांनी केले. तर ‘सिलसिला’, ‘कभी-कभी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा चित्रपटांमधून प्रेमाची नवी परिभाषा उलगडली.

चित्रपट गाजविणाऱ्या अमिताभ यांना ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.त्यानंतर १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसंच चौदा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांच्या नावे आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेवर निवडून गेले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 8:57 am

Web Title: big b amitabh bachchan 76 st birthday
Next Stories
1 #MeToo : नाना पाटेकरांसह चार जणांवर गुन्हा दाखल
2 #MeToo: आमिर खानचा मोठा निर्णय, लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट सोडला
3 गोव्यात अभिनेता प्रतिक बब्बरविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X