News Flash

“भारताचा अभिमान”; मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्राने शोक व्यक्त केला

अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या कुटुबियांचं सांत्वन केलंय.

(File Photo/Milkha-Singh/priyanka chopra/amitabh bachachan)

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांच्या निधनाच्या बातमीनंतर संपूर्ण देशभरातून दु:ख व्यक्त केलं जातंय. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारे मिल्खा सिंग हे पहिले भारतीय ठरले होते. मिल्खा सिंग यांचा हा विक्रम ५० वर्षांहून अधिक काळ कायम राहिला. मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर देशातील विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. बॉलिवूडमधील देखील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केलाय.

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट करत मिल्खा सिंग यांच्या निधानाचं दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “दु:खात..मिल्खा सिंग यांचे निधन ..भारताचा अभिमान .. एक उत्तम धावपटू…एक महान व्यक्ती..त्यांच्यासाठी प्रार्थना” असं म्हणत बिग बी अमिताभ बच्चन यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा: ‘मी हे स्विकारायलाच तयार नाहीये’; मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक

तर अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांच्या कुटुबियांचं सांत्वन केलंय. ” प्रेमाने स्वागत करत तुम्ही आपली पहिली भेट अगदी खास केली होती. आपल्या देशासाठी केलेल्या योगदानामुळे, तुमच्या कर्तृत्वामुळे आणि विनम्रतेमुळे मी प्रेरित झाले आहे. ओम शांती मिल्खा जी.” असं म्हणत प्रियांकाने तिच्या पोस्टमधून मिल्खा सिंग यांच्या कुटुंबियांचं सांत्वनदेखील केलंय.

मिल्खा सिंग यांनी आपल्या कामगिरीने जगाच्या नकाशावर भारताचं नाव कोरलं. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 9:47 am

Web Title: big b amitabh bachchan and priyanka chopra paid tribute to flying sikh milkha singh on tweeter post kpw 89
Next Stories
1 ‘मी हे स्विकारायलाच तयार नाहीये’; मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक
2 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने घेतली करोना लस
3 ‘इंडियन आयडल १२’मध्ये सायली कांबळेच्या वडिलांसाठी होता सुपरहीरो क्षण
Just Now!
X