News Flash

बिग बींच्या नातीसोबत हा ‘मिस्ट्री मॅन’ आहे तरी कोण?

प्रसारमाध्यमांसमोर नव्या सहसा गोंधळून जाते

बिग बींच्या नातीसोबत हा ‘मिस्ट्री मॅन’ आहे तरी कोण?
नव्या नवेली नंदा

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सुद्धा अनेकांच्या ओळखीचा चेहरा झाली आहे. सेलिब्रिटी किड्सच्या यादीत अमिताभ यांच्या मुलीचा म्हणजेच श्वेता नंदाच्या नावाचाही समावेश होतो. नव्या नवेली ही श्वेता नंदाची मुलगी आहे. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असून, बरेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.

मुख्य म्हणजे प्रसारमाध्यमांच्याही नव्या नवेलीवर नजरा असतात. सध्याच्या घडीला ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून, यावेळी ती चर्चेत येण्याचं कारणही तसंच आहे. रविवारी रात्री मुंबईतील एका चित्रपटगृहातून बाहेर पडताना नव्याची एक झलक टीपण्यासाठी छायाचित्रकारांनी तिच्याभोवती गराडा घातला. त्यावेळी तिच्यासोबत एक मुलगाही होता. माध्यमांचे कॅमेरे पाहताच त्या मुलाने लगेचच सदऱ्याने त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. चेहरा लपवतच त्याने कार पुढे नेली. त्याचं हे असं चेहरा लपवणं, अनेक प्रश्नं उपस्थित करुन गेलं आहे. नव्या तिच्या खासगी आयुष्यामुळेही बरीच चर्चेत असते. आता स्टार किड्सच्या यादीत असल्यामुळे तिचं असं चर्चेत येणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे नव्यासोबतचा हा मिस्ट्री मॅन आहे तरी कोण, हाच प्रश्न आता अनेकांच्या मनात घर करून राहिलाय.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

बिग बींच्या या लाडक्या नातीने म्हणजेच नव्याने नुकतच तिचं शिक्षण पूर्ण केलं असून आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रसारमाध्यमांसमोर नव्या सहसा गोंधळून जाते ते याआधीही आपल्याला पाहायला मिळालं होतं. असचं काहीसं यावेळीही घडलं. आपल्या खास मित्रासोबत असताना कॅमेऱ्यांची नजर तिच्याकडे वळल्यानंतर ती अशीच गोंधळून गेल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO: ‘चीज बडी है मस्त मस्त’चं हे व्हर्जन ऐकलं का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 2:49 pm

Web Title: big b amitabh bachchan granddaughter navya naveli nanda spotted with mystery man
Next Stories
1 सलमान खानची ग्रॅण्ड ईद पार्टी
2 कंगना रणौतचा करणवर पुन्हा एकदा वार
3 सैफची ही बहिण आहे २७०० कोटींची मालकीण
Just Now!
X