News Flash

“फक्त काम मिळत राहवं”, बिग बींच्या पोस्टवर चाहते म्हणाले “आता पुरे..आराम करा”

बिग बींनी केलेल्या ट्वीटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. बिग बींनी ट्वीटमध्ये त्यांना काम हवं असल्याचा उल्लेख केला आहे.

(photo-instagram@ Amitabh Bachchan)

बॉलिवूडचे शेहनशाह बिग बी अमिताभ बच्चन ७८ वर्षांचे असले तरी आजही त्यांचा उत्साह तरुण कलाकारांना लाजवेल असा आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन मोठी मेहनत घेतात. आजवर वेगवेगळ्या पिढीतील कलाकारांसोबत बिग बीनी काम केलंय. कोणताही तरुण चेहरा असो मात्र बिग त्यांच्या अभिनयाने प्रत्येक सिनेमात भाव खाऊन जातात. वय वाढत असलं तरी बिग बींचा काम करण्याचा उत्साह काही कमी झालेला आणि याचच उदाहरण म्हणजे बिग बींनी नुकतच केलेलं एक ट्वीट.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकतच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे अनेक चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलंय. तर काही चाहत्यांनी मात्र बिग बींना ट्रोल देखील केलंय.

भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून बॉलिवूडला देखील मोठा फटका बसला आहे. अनेक सिनेमांचं शूटिंग वेळोवेळी रखडलं तर काही सिनेमे अद्याप प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. अशात बिग बींनी केलेल्या ट्वीटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. बिग बींनी त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांना काम हवं असल्याचा उल्लेख केला आहे. “जीवन की संतुष्टि .. जीवन का मोक्ष ..बस काम मिलता रहे..” असं बिग बी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहे…”बस काम मिळत रहावं” या त्यांच्या वाक्याने काही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या.

हे देखील वाचा: अभिनयातच नव्हे तर अभ्यासातही ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी मारलीय बाजी, शिक्षण ऐकून व्हाल थक्क!

बिग बींनी या पोस्टसोबतच त्याचा एक गंभीर फोटो शेअर केलाय.बिग बींच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणाला, “सर तुम्ही इतकं काम करून थकत नाही का? काम करण्यात तुम्ही मोदीजींना टक्कर देणार वाटतं”

हे देखील वाचा: कंगना रणौतला हायकोर्टाचा दणका, पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात अद्याप दिलासा नाही

तर दुसरा युजर म्हणाला, :”खूप झालं आता आराम आणि ध्यान करा.”

तर अनेक युजर्सनी बिग बींच्या उत्साहाचं कौतुक केलंय. बॉलिवूडमध्ये कोणत्याही अभिनेत्याच्या तुलनेत बिग बींनी सर्वाधिक आणि उत्तम काम केलं असल्याचं चाहते म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या काळात बिग बी अनेक सिनेमांमध्ये झळकणार आहेत. अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांचा ‘चेहरे’ सिनेमा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. तर आलिया आणि रणबीरसोबत बिग बी ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. यासोबतच ‘कौन बनेगा करोडपति’ च्या १३ व्या सिझनमध्ये बिग बी पुन्हा एकदा अनेकांची फिरकी घेताना दिसतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 6:32 pm

Web Title: big b amitabh bachchan tweet viral said he want work fan comment take rest kpw 89
Next Stories
1 बर्थडे पार्टीत ड्रग्ज घेणाऱ्या अभिनेत्रीला अटक
2 “मला पॉर्न स्टार नाही, अभिनेता व्हायचं आहे”, बोल्ड सीनवरून अभिनेत्याचं वक्तव्य
3 The Family Man 2: ‘त्या’ इटालियन पदार्थाचा उच्चार करताना बोबडी वळली, मनोज वाजपेयीने शेअर केला किस्सा
Just Now!
X