News Flash

बिग बी.. बिग सस्पेंस; नव्या सिनेमाची घोषणा?

बिग बींनी चाहत्यांना टाकलं कोड्यात

बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावरुन कायम चाहत्यांशी संवाद साधत असतात. फोटोसोबतच बिग बी त्यांच्या खास शैलीत वेगवेगळ्या कविता आणि चारोळ्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.

नुकताच बिग बींनी त्यांच्या फोटोसह एक कविता पोस्ट केली आहे. त्यांच्या या कवितेमुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्यातच त्यांनी लेदर जॅकेट आणि गॉगलमधला फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा अंदाज चाहत्यांच लक्ष वेधून घेत असून या फोटोला चाहत्यांची पसंती मिळतेय. बिग बींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या हातात एक ग्लास असून ते लिंबाचं सरबत पीत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

या फोटोसोबतच त्यांनी एक कविताही शेअर केलीय. ‘नीबू पानी धूप में ,चश्मा जैकेट शूट में ;कहाँ है ये और कौन सी है ,पता चले कुछ देर में’. बिग बींच्या या कवितेमुळे मात्र आता चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलीय. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवरुन चाहत्यांमध्ये सस्पेंस निर्माण झालाय. बिग बी लवकरच नव्या सिनेमाची घोषणा करणार असा तर्क देखील लावला जातोय.

‘कुठे आहे आणि कोण आहे ही?’ या बिग बींंच्या कवितेतील  शेवट्या दोन ओळींमुळे ते सिनेमाबद्दल बोलत आहेत की एखाद्या व्यक्तीबद्दल याचा अंदाज लावण तसं कठीण आहे.

बिग बी सध्या अजय देवणगसोबत ‘मे डे’ या सिनेमाचं शूटिंग करत आहेत. बिग बींनी शेअर केलेला फोटो हा नेमका कोणत्या सेटवरचा आहे हे लक्षात येत नसल्यानं सस्पेंस ताणला गेलाय. बिग बी आणखी एखादी पोस्ट करत या रहस्याचा उलगडा करतील याची चाहत्यांना आतुरता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 5:15 pm

Web Title: big b amitabh bachchan tweeted photo with suspence kw89
Next Stories
1 कंगनाचा अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा; म्हणाली, ‘आशा आहे की….’
2 स्वप्नालीच्या घरी लगीनघाई! हातावर रंगली आस्तादच्या नावाची मेंदी
3 कार्तिक आर्यनच्या बहिणीचा घोळ; किट्टूला विमानात नो एण्ट्री
Just Now!
X