गेल्या शनिवारपासून पठाणकोट येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. यामध्ये भारताच्या जवांनाना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अभिनेता अमिताभ बच्चन यांनी भारतीय तिरंगा हा फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचा प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला आहे.
जेव्हा पॅरिस हल्ला झाला होता तेव्हा तेथील लोकांनी त्यांचा राष्ट्रध्वज प्रोफाइल फोटो म्हणून ठेवला होता. त्यामुळे मीसुद्धा आता तसेच केले, अशी प्रतिक्रिया अमिताभ यांनी चाहत्याने टाकलेल्या पोस्टवर दिली आहे.