News Flash

‘बिग बी’कडून सुलोचनादीदींचे अभीष्टचिंतन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या ८६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी सुलोचना यांच्या घरी जाऊन त्यांचे खास अभीष्टचिंतन केले आणि त्यांच्या पाया पडून

| August 2, 2015 03:25 am

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या ८६ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी सुलोचना यांच्या घरी जाऊन त्यांचे खास अभीष्टचिंतन केले आणि त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले.
मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या आणि बॉलीवूडच्या चित्रपटात रुपेरी पडद्यावर अनेक नायकांची ‘आई’ झालेल्या सुलोचनादीदी यांचा ८६ वा वाढदिवस गुरुवारी घरगुती स्वरूपात साजरा करण्यात आला. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी सुलोचनादीदींचे अभीष्टचिंतन केले, यात ‘बिग बी’ अमिताभ यांचाही समावेश होता.
या भेटीबाबत अमिताभ यांनी ‘ट्विटर’वरून ट्वीट करून माहिती दिली आहे, तसेच या भेटीप्रसंगीची छायाचित्रेही जाहीर केली आहेत्

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:25 am

Web Title: big b wish to birthday wish to sulochana
Next Stories
1 उमेश शुक्लांची
2 ‘लग्नाला यायचं हं’
3 विक्रम गोखले आणि रिमा म्हणतात..‘के दिल अभी भरा नही’!
Just Now!
X