27 October 2020

News Flash

अमिताभ यांच्याकडून अभिषेक-ऐश्वर्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे २० एप्रिल २००७ रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.

Big B wishes Abhishek Aishwarya Rai Bachchan on 9th wedding anniversary : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे २० एप्रिल २००७ रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते.

अमिताभ बच्चन यांनी बुधवारी त्यांचा मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला आज नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. हा क्षण आनंदाचा आणि सुखाचा असल्याचे अमिताभ यांनी शुभेच्छा देताना म्हटले.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे २० एप्रिल २००७ रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. यानंतर नोव्हेंबर २०११मध्ये त्यांच्या मुलीचा आराध्याचा जन्म झाला होता.
उद्याचा दिवस उगवेल तेव्हा तुमच्या नात्याला नऊ वर्षे पूर्ण होतील. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा आणि सुखाचा क्षण असेल, कारण या दिवशी विवाहबंधनात फक्त तुम्ही दोघेच नव्हे तर आम्ही मोठी मंडळीही बांधली गेलो. तो क्षण म्हणजे कुटुंबांनी एकत्र येण्याचा आणि प्रेमाचा व एकोप्याचा होता, असे अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 12:31 pm

Web Title: big b wishes abhishek aishwarya rai bachchan on 9th wedding anniversary
टॅग Bollywood
Next Stories
1 …तरच मी सलमानसोबत काम करेन- दीपिका पदुकोण
2 प्रत्युषाच्या आत्महत्येचा आणि गर्भपाताचा काहीही संबंध नाही
3 मोहम्मद अझरुद्दीनसारखे दिसण्यासाठी इम्रान हाश्मीने केल्या या गोष्टी
Just Now!
X