News Flash

भविष्यात हिनाचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही- शिल्पा शिंदे

'हिनाला माझी प्रत्येक गोष्ट खटकत होती.'

हिना खान, शिल्पा शिंदे

टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे अकरावे पर्व नुकतेच संपले. ‘भाभीजी घर पर है’ फेम अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शिल्पा शिंदे या शोची विजेती ठरली. या स्पर्धेत तिला हिना खानने टक्कर दिली होती. साडेतीन महिन्यांपर्यंत चाललेल्या या शोदरम्यान हिना आणि शिल्पामध्ये बरेच वादविवाद झाले. म्हणूनच शो संपल्यानंतरही भविष्यात हिनाला कधीच भेटण्याची इच्छा नसल्याचे शिल्पाने प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले.

हिनासोबत झालेल्या वादासंदर्भात शिल्पा म्हणाली, ‘हिनाला माझी प्रत्येक गोष्ट खटकत होती. सलमानने माझी प्रशंसा केली, तरी तिला खटकत असे. आईसारखी तू सर्वांची काळजी घेत असतेस, असे मला सलमानने म्हटले होते. त्याचे हे वाक्य मी जास्तच गंभीरपणे घेतल्याचे तिने अनेकदा मला सुनावले. किचनमध्ये काम करण्यास कोणीच पुढे सरसावत नव्हते. तेव्हा मी किचनची जबाबदारी स्विकारली. त्याचाही तिला त्रास होता. किचनमध्ये मी काहीच काम करत नाही, असा आरोपही तिने केला.’

वाचा : ‘एक बॉम्ब कमी तयार करा, पण सॅनिटरी नॅपकीन मोफत द्या’

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शिल्पाने चाहत्यांचेही आभार मानले. विकास गुप्तासोबत झालेले भांडण असो किंवा अर्शी खानशी असलेले वाद शोच्या सुरुवातीपासूनच शिल्पा विविध कारणांमुळे चर्चेत राहिली. चाहत्यांनीही तिला भरभरून मत दिले होते. शेवटपर्यंत हिना आणि शिल्पामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. पण अखेर चाहत्यांनी केलेल्या मतांच्या जोरावर मराठमोळ्या शिल्पाने ‘बिग बॉस ११’चे जेतेपद पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 1:21 pm

Web Title: big boss 11 winner shilpa shinde said she dont want to meet hina khan again in my life
Next Stories
1 PHOTOS : ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत भाव खातेय बॉलिवूडची ‘मस्तानी’
2 हृतिक ठरला जगातील सर्वात ‘हॅण्डसम’ अभिनेता, हॉलिवूड अभिनेत्यांवर केली मात
3 शिल्पाच्या ‘मेटॅलिक साडी’ची चर्चा
Just Now!
X