News Flash

‘बिग बॉस १३’मध्ये दिसणार ‘हे’ स्पर्धक?

बिग बॉस १३ला २९ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे

सलमान खान

‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर चांगलाच लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही या शोला विशेष पसंती मिळत असते. वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. या घरात कोणाला प्रवेश मिळणार, यंदाची थीम काय असणार याबाबतच्या अनेक चर्चांना चाहत्यांमध्ये उधाण आले आहे. आता बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक सहभागी होणार हे समोर आले आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच असणार आहे.

आयबी टाईम्सने दिलेल्या वृत्तानूसार बिग बॉसच्या घरातील सात स्पर्धक घोषीत करण्यात आले आहेत. दरम्यान या सातही स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेशासाठी होकार कळवला असल्याचे म्हटले जात आहे. ‘फॅशन’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसेने बिग बॉस १३च्या घरात जाण्याल होकार कळवला होता.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि मॉडेल माहिका शर्मादेखील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘बालिका वधू’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. सिद्धार्थने अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या ‘हमटी शर्मा की दुल्हनीया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता सिद्धार्थ बिग बॉसच्या घरात येणार असल्याचे म्हटले जात आहे. चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका आणि आवडता अभिनेता चंकी पांडे सलमानच्या बिग बॉस १३मध्ये स्पर्धक म्हणून येणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या चंकी ‘साहो’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे.

छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथीया’ या मालिकेत काम करणारी अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु तिला याबाबत विचारताच तिने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा अभिनेता राजपाल यादव बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याने बिग बॉसच्या घरात येण्यासाठी होकार कळवल्याचे देखील म्हटले आहे.

गायक उदीत नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण अनेक रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेला पाहयला मिळतो. आता तो बिग बॉस १३मध्ये स्पर्धक म्हणून येणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘बिग बॉस १२’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलेही होते. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम हॉरर असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ‘बिग बॉस १३’च्या यंदाच्या पर्वामध्ये हॉरर ही थीम पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 2:52 pm

Web Title: big boss 13 contestant avb 95
Next Stories
1 Video : कोल्हापुरात गुडघाभर पाण्यात राणादा आणि पाठक बाई
2 नेहामुळे माधव घराबाहेर? शिवानीचा आरोप
3 नेहा धुपियाने शेअर केला स्तनपान करतानाचा फोटो, लिहिली भावनिक पोस्ट
Just Now!
X