News Flash

‘बिग बॉस’ फेम अर्शी खानला करोनाची लागण; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली.

सोशल मीडियावरून दिली माहिती

देशात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लसीकरण सुरु झालं असलं. तरी करोना रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. यातच गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटींना देखील करोनाची लागण झाली आहे. यातच ‘बिग बॉस’ फेम अर्शी खानला करोनाची लागण झाली आहे.

‘बिग बॉस-14’ ची स्पर्धक अर्शी खानला करोनाची लागण झाली आहे. अर्शीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ती पोस्टमध्ये म्हणाली आहे. ” काही वेळापूर्वीच मला एअरपोर्ट अथॉरिटी कडून माझा कोव्हिड-१९ रिपोर्ट मिळाला आहे. 19 एप्रिलला माझी चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. कालपासून मला सौम्य लक्षणं दिसू लागली आहेत. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी नियमांचं पालन करावं, सुरक्षित रहा, अल्लाह तुम्हा सगळ्यांचं रक्षण करो.” अशी पोस्ट अर्शी खानने शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

नुकतच अर्शी खानला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी एका चाहत्याच्या कृत्यामुळे अर्शीला धक्का बसला. सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाने अचानक अर्शीचा हात पकडला आणि तिच्या हातावर किस केलं. त्यानंतर तीला धक्का बसला होता. चाहत्याचे वागणे पाहून अर्शी ‘चला चला आता इथून जा’ असं ती म्हणाली.

आणखी वाचा- डान्स दीवानेच्या सेटवर ‘या’ डान्सरला करोनाची लागण

गेल्या काही दिवसात अभिनेता वरुण धवन, गोविंदा, अक्षय कुमार तसचं अभिनेत्री आलिया भट्ट अशा अनेकांनी करोनाशी दोन हात केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 10:31 am

Web Title: big boss ex contestant arshi khan tested covid 19 positive share post goes viral kpw 89
Next Stories
1 डान्स दीवानेच्या सेटवर ‘या’ डान्सरला करोनाची लागण
2 “तू पुरुषी आवाजात गाते”, सुनिधी चौहानने सांगितला संगीत दिग्दर्शकाचा ‘तो’ अनुभव
3 मराठी मालिकांचेही राज्याबाहेर चित्रीकरण
Just Now!
X