बिग बॉस फेम निक्की तांबोळीच्या भावाचं करोनामुळे निधन झालंय. निक्कीचा भाऊ केवळ 29 वर्षांचा होता. त्यामुळे भावाच्या निधनानंतर तिच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खातून सावरण्याआधीच निक्कीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र या ट्रोलर्सना निक्कीने सडेतोड उत्तर दिलंय.

निक्की तांबोळी खतरो के खिलाडी या शोच्या अकराव्या पर्वात सामिल होण्यासाठी नुकतीच साउथ अफ्रिकेला रवाना झाली आहे. निक्कीने तिच्या सोशल मीडियावर इतर कलाकारांसोबतचे काही फोटो आणि मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. मात्र नोटकऱ्यांनी निक्कीच्या या पोस्टवरून तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वीच भावाचं निधन झालं असताना निक्कीने आनंदी असल्याच्या पोस्ट करणं नेटकऱ्यांना खटकलं. त्यांनी तिला ट्रोल केलं. मात्र आता या ट्रोल करणाऱ्यांची निक्कीने बोलती बंद केलीय.

निक्कीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केलीय. यात तिने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत ट्रोल करणारे मूर्ख असल्याचं म्हंटलं आहे. निक्की तिच्या पोस्टमध्ये म्हणाली, “काही मूर्ख लोक मला मेसेज करत आहेत आणि माझ्या फोटोवर कमेंट करत आहेत की माझ्या भावाचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. तुला लाज वाटत नाही , तू मजा करतेयस?” निक्कीला आलेल्या कमेंटचा तिने या पोस्टमध्ये उल्लेख केलाय.

nikki tamboli post
(photo-instagram@nikki-tamboli)

तुमची स्वप्न पूर्ण करा
तर पुढे ती म्हणाली, ” तर अशा मूर्खांना मी सांगू इच्छिते की माझं पण स्वत:च आयुष्य आहे. मलादेखील आनंदी राहण्याचा अधिकार आहे, माझ्यासाठी नव्हे तर माझ्या भावासाठी ज्याला मला आनंदी पाहून कायम समाधान वाटायचं. आणि हे लोक ज्यांच्याकडे काही काम नाही जे फक्त कमेंट करणं आणि नकारात्मकता पसरवण्याचं काम करतात. अशा लोकांना माझी विनंती आहे की जा तुमची स्वप्न पूर्ण करा. यामुळे तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या जीवलगांना आनंद होईल.” या शब्दात निक्कीने ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली.

खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यापूर्वी निक्कीने सांगितले होते की तिच्या भावाची इच्छा होती तिने या शोमध्ये सहभागी व्हावे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ‘मी माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथे एकीकडे माझे कुटुंबीय कठिण काळातून जात आहे आणि दुसरीकडे माझ्या कामाच्या कमिटमेंट’ असे तिने म्हटले होते.
४ मे रोजी निक्की तांबोळीचा भाऊ जतिन तांबोळीचे निधन झाले.