News Flash

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात परतणार

येत्या एपिसोडमध्ये बिचुकले बिग बॉसमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

मराठी बिग बॉस सिझन 2 चे स्पर्धक अभिजीत बिचुकले हे बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा एन्ट्री घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी ते बिग बॉसच्या घरात परतणार आहेत. 21 जून रोजी चेक बाऊंसप्रकरणी बिचुकलेंना बिग बॉसच्याच घरातून पोलिसांनी अटक केली होती.

चेक बाऊन्स बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. तर खंडणीच्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. हे सर्व घडत असतानाच आता अभिजीत पुन्हा बिग बॉसच्या घरात जाऊ शकतील का असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये उपस्थित होत होता. पहिल्या दिवसापासून अभिजीत बिचुकले विविध गोष्टींमुळे चर्चत होते. त्यामुळे शोच्या टीआरपीसाठी बिग बॉसची टीम त्यांना परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत होती.

आता लवकरच ते पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसण्याची शक्यता आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त दिले आहे. अभिजीत बिचुकलेमुळे साताऱ्याचे नाव उंचावले जात होते आणि अभिजित बिचुकले असेच खेळत राहिले तर त्यांना बिग बॉसचे पारितोषिकही मिळेल अशी आशा असल्याचे यापूर्वी फिर्यादीने म्हटले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर बिचुकलेंची सुटका झाल्यास त्यांना बिग बॉसची टीम थेट घरात घेऊन जाऊ शकते अशा शक्यताही यापूर्वी व्यक्त करण्यात आल्या होत्या.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:28 pm

Web Title: big boss marathi season 2 abhijit bichukale soon to return in big boss house jud 87
Next Stories
1 …म्हणून ‘मिशन मंगल’च्या पोस्टरवर अभिनेत्रींपेक्षा अक्षयचा फोटो मोठा: विद्या बालन
2 अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी
3 अग्गंबाई सासूबाईमधील सोहम आहे ‘या’ दिग्गज कलाकाराचा मुलगा
Just Now!
X