कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे. रेशम, जुई, सुशांत, आस्ताद, स्मिता आणि बाकीच्या सदस्यांना बिग बॉसने सरप्राईज दिले. राजेश पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरी परतला. राजेशला घरी परतल्याचे पाहून रेशम खूपच खुश झाली. राजेशने त्याचा सहा दिवसांचा अनुभव घरातील सदस्यांसोबत शेअर केला.

तसेच राजेश सिक्रेट रूममध्ये असताना घरातील सदस्य कोणाबद्दल काय बोलत आहेत हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. बिग बॉस आज घरातील सदस्यांना नवा टास्क देण्यात आला.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘थेंबे थेंबे तळे साचे’ हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. पाण्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी घरातील सगळ्या नळांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. या कार्यांतर्गत घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली. या टीम्सना दोन रिकाम्या टाक्या देण्यात येणार आहेत. घरातील कुठल्याही कार्यास पाणी हवे असल्यास सदस्यांना या टाकीत पाणी भरायचे आहे आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे.

जेव्हा पाणी सोडण्यात येईल तेव्हा टीमच्या टाकीत पाणी भरायचे आहे आणि त्यासाठी टीमना बादल्या देण्यात येणार आहेत. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित आहे. तेव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील? कोणाची भांडण होतील? कोण संयम राखून खेळेल? हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.