News Flash

Big Boss Marathi: स्पर्धकांना मिळणार सरप्राइज

उषा नाडकर्णींचा मुलगा नंदकिशोर वर नाराजगी व्यक्त करताना

बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धक आता नवव्या आठवड्यामध्ये पोहचले असून संयमासोबतच त्यांच्यातील आत्मनिग्रह तपासून पाहण्याची वेळ आली आहे. यासाठी बिग बॉस स्पर्धकांना फ्रीझ- रीलीझ हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्यांतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना सुंदर असे सरप्राइज मिळणार आहे.

आज घरामध्ये उषा नाडकर्णी यांचा मुलगा, स्मिताची आई तसेच सईची आई येणार आहेत. उषा नाडकर्णींचा मुलगा नंदकिशोरच्याप्रती त्याची नाराजगी व्यक्त करताना दिसणार आहे. तसेच नंदकिशोरने जे केले ते चुकीचे होते हेदेखील स्पष्टपणे सांगणार आहे. स्मिताची आई घरामध्ये आल्यावर पहिल्यांदा आऊ यांना भेटणार आहेत. तर सई आईला बघून खूपच भाऊक होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सगळ्या सदस्यांना एक संदेश दिला.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पडली. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पडली.

या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून घराबाहेर जाण्यासाठी शर्मिष्ठा, भूषण हे नॉमिनेट झाले तर घराची कॅप्टन सईला विशेष अधिकार देण्यात आला. सई कोणत्याही एका सदस्याला या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट करू शकत होती आणि सईने स्मिताला नॉमिनेट केले. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 2:08 pm

Web Title: big boss marathi today task frizz and surprise
Next Stories
1 Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?
2 गुगलवर ‘धडक’च्या सर्चने नेटकरी सैराट
3 ३ लग्न करुनही एकटीच पडली अँजेलिना जोली
Just Now!
X