आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. आजची नॉमिनेशन प्रक्रिया सर्व सदस्यांसमोर पार पडणार आहे, असे बिग बॉस घोषित करणार आहेत. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही. तसेच हा खेळ समजण्याचे बौद्धिक चातुर्य नाही अशा सदस्यांसाठी नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाईल, असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले.

https://www.instagram.com/p/Bj4Ro4rh4jr/

या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे त्याच्या चेहऱ्याला शाहीची पावडर फासणे अनिवार्य असणार आहे. तेव्हा आज कोण नॉमिनेट होणार आणि कोण घराबाहेर जाणार हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा हे सगळे पाहायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल त्यागराज खाडिलकर घराबाहेर पडला. भूषण, रेशम आणि त्यागराज हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. भूषण आणि रेशम यांच्यापेक्षा त्यागराजला सर्वात कमी मत मिळाले त्यामुळे तो घराबाहेर गेला. घरातून बाहेर गेल्यावर त्यागराजने घरच्यांना काही गैरसमज असतील ते घरच्यांनी मनामध्ये ठेऊ नका असेदेखील सांगितले. आता नवीन आठवडा सुरु झाला आहे. आता घरातील सदस्यांना साप्ताहिक कार्य, कॅप्टनसीचे कार्य आणि बरेच नवे टास्क मिळणार आहेत.