24 February 2019

News Flash

Big Boss Marathi: नव्या टास्कसाठी पुन्हा भिडले स्पर्धक

सगळ्यांना भूषणचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस स्पर्धकांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या कार्यांतर्गत स्पर्धकांची तीन टीममध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम अ- दात, टीम ब- डाबर रेड पेस्ट आणि टीम क कॅव्हिटी असणार आहेत. टीम अ ला म्हणजेच दातांना टीम क मधील स्पर्धकांपासून म्हणजेच कॅव्हिटीपासून वाचविण्याची टीम बची जबाबदारी असणार आहे. आता या टास्कमध्ये कोणती टीम विजयी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील फ्रीझ- रीलीझ हे साप्ताहिक कार्य रंगले. या कार्यांतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या स्पर्धकांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर सरप्राइज मिळाले. शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला तर भूषणच्या बायकोने भूषणला मार्गदर्शन केले आणि त्यांची हिंमतदेखील वाढवली.

भूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले की, ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले की, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी घरी गेल्या होत्या.

मेघाच्या मुलीने मेघा आणि सईला एक निरोपदेखील दिला. तेव्हा पाहायला विसरू नका आज फ्रीझ- रीलीझ टास्कमध्ये काय घडणार तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्कमध्ये कोणती टीम विजयी होणार बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

First Published on June 14, 2018 6:37 pm

Web Title: big boss marathi todays episode precap 3