News Flash

असा असेल बिग बॉस मराठीचा आजचा दिवस

तसेच या टास्कदरम्यान राजेश आणि सुशांत शक्तीचा वापर करणार आहेत, ज्याला परवानगी नाहीये

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. ज्याप्रमाणे फुले कुठलाही भेद न बाळगता सर्वांना एकसारखा सुगंध देतात, अगदी त्याचप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टनने सर्वांना एक समान न्याय देणे, आनंद देणे अपेक्षित आहे. म्हणूनच सदस्यांमधील वेगवेगळ्या रंगाची पारख करण्यासाठी बिग बॉस सदस्यांना “रंग माझा वेगळा” हे कॅप्टनसीचे कार्य देणार आहेत. कॅप्टनसीसाठी पात्र असलेल्या दोन उमेदवारांनी आपली छानशी फुलांची बाग तयार करायची आहे. बागेमध्ये स्वत:ची फुले रोवून बाग सजवायची आहे. त्या उमेदवाराचे समर्थक त्यांच्यासोबतच उभे असणार आहेत. तर बाकीच्या सदस्यांना आपल्या आवडत्या उमेदवाराच्या रंगीत फुलांची बाग जपायची आहे. पुष्कर आणि सुशांत हे दोघेही कॅप्टनसीसाठी या आठवड्यामधील उमेदवार असून ते ही बाग आज सजवणार आहेत.

तसेच या टास्कदरम्यान राजेश आणि सुशांत शक्तीचा वापर करणार आहेत, ज्याला परवानगी नाहीये… बिग बॉसने वारंवार सूचना देऊनही दोघांकडून या नियमाचे उल्लंघन होणार आहे. हिंसेचा वापर केल्याने बिग बॉस राजेश आणि सुशांत या दोघांनाही कठोर आणि कडक शब्दांमध्ये त्याची जाणीव करून देणार असून हे दोघेही बिग बॉसच्या शिक्षेस पात्र असणार आहेत. बिग बॉस यांनी घरातील सगळी कामे हे दोघे करणार असून त्यांना कोणीही मदत करू शकत नाही अशी घोषणा करणार आहेत. त्यामुळे हे दोघे कशी ही शिक्षा पूर्ण करतील? पुष्कर की सुशांत यांपैकी नवीन कॅप्टन कोण होईल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

घरामध्ये काल सगळ्या स्पर्धकांना सरप्राईज मिळाले. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकरची घरामध्ये एण्ट्री झाली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सर्व रस्पर्धकांनी तिचे आनंदाने स्वागत केले. तसेच काल आस्ताद काळेलादेखील सरप्राईज मिळाले. आस्तादचा काल वाढदिवस होता आणि त्यानिमित्त त्याच्या आईने त्याच्यासाठी केक बनवून पाठवला होता. हर्षदा या घरामध्ये आल्यानंतर बिग बॉसने तिला लगेचच एक कार्य दिले ज्याचे नाव होते ‘बिंब- प्रतिबिंब’ ज्यामध्ये हर्षदा आरश्याचे प्रतिनिधित्व करत होती.

यामध्ये हर्षदाला तिची रोखठोक मतं मांडायची होती. आरसा कधीच खोट बोलत नाही तो खरं प्रतिबिंब दाखवतो. समाजाच्या आरशात बिग बॉस मराठीच्या सदस्यांची काय नवी प्रतिमा तयार झाली आहे हे हर्षदाने सदस्यांना सांगितले. हर्षदाने कार्यादरम्यान स्पर्धकांची सकारात्मक आणि नकारात्मक मतं सांगायची. हर्षदाला दिलेला हा टास्क आजदेखील सुरू राहणार आहे.

हर्षदाने राजेश आणि रेशमला कठोर शब्दांमध्ये त्यांचे घरामध्ये जे काही सुरु आहे त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोघांना त्यामध्ये काही गैर वाटत नाही असे त्यांनी दिलेल्या कार्यादरम्यान बोलून दाखविले. यानंतर हर्षदाने मेघा, सई, जुई, स्मिता यांनादेखील त्या कुठे चुकत आहेत, कुठे त्यांना संयम दाखविण्याची गरज आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. खानविलकर यांना दिलेला हा टास्क आज देखील सुरु राहणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 9:36 pm

Web Title: big boss marathi todays episode special insident
Next Stories
1 …जेव्हा रणबीर दीपिकाला म्हणाला, ‘आजही करतो प्रेम’
2 Raazi Movie Collection Day 7: ‘राजी’ची घौडदौड सुरूच… सात दिवसांत केली एवढ्या कोटींची कमाई
3 सोनम कपूरने केले रणवीर- दीपिकाच्या लग्नावर शिक्कामोर्तब?
Just Now!
X