News Flash

Big Boss Marathi: घरातील रहिवाश्यांना मिळाले पहिले लक्झरी बजेट

घरातील सदस्यांना थोडी थोडी त्यांच्या घरच्यांची आठवण येते आहे हे दिसून येणार आहे

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रहिवाशी संघामध्ये एकच चर्चा ऐकायला मिळत होती आणि ती म्हणजे लक्झरी बजेट किती मिळेल. घरातील नवा कॅप्टन आस्ताद काळे झाला असून त्याने सगळ्या सदस्यांना सांगितले की, बजेट चांगले मिळाले आहे त्यामुळे गरजेच्या गोष्टीच मागवूया ज्याला बाकीच्या सदस्यांनीदेखील संमती दाखवली. बिग बॉसच्या घरामध्ये पडत असलेल्या ग्रुपचा फायदा दोन जुन्या मैत्रिणींना झाला. मेघा आणि आरती यांच्या मैत्रीमध्ये काही कारणांमुळे आलेला दुरावा याच कार्यक्रमामुळे दूर होत आहे असे दिसून येणार आहे. मेघा आणि आरती काही वर्षांपूर्वी खूप चांगल्या मैत्री होत्या.

मेघा कार्यक्रमामध्ये आरतीला तिचा पूर्ण पाठिंबा आहे असेदेखील सांगताना दिसणार आहे. मेघा आणि आरतीमध्ये घरात तयार होत असलेल्या ग्रुपबद्दलदेखील चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये मेघाने आरतीला आपण एकत्र होऊन खेळण्याची गरज आहे असे सांगणार आहे. विनीत भोंडेचा कॅप्टन म्हनून कार्यकाल संपल्यानंतर घरच्यांनी बहुमताने आस्ताद काळेला घरचा नवा कॅप्टन केला असून आता त्याच्या कार्यकालमध्ये घराचा तो सांभाळ कसा करेल? त्याच्यासमोर कोणत्या अडचणी येतील? सदस्य त्याला समजून घेतील का? हे पाहणे रंजक असणार आहे.

घरातील सदस्यांना थोडी थोडी त्यांच्या घरच्यांची आठवण येते आहे हे दिसून येणार आहे. ऋतुजा आणि सई या दोघींनाही घरच्यांची आठवण येत असून त्यांनी ही गोष्ट पुष्करजवळ सांगितली. सई पुष्करला तिच्या मनामध्ये नक्की काय आहे सांगणार असून पुष्कर सईला समजविण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सईशी घरातील सगळे सदस्य चांगले वागत असून, आता नॉमिनेट कसं करायचं? कोणाला करायचं? काय कारण द्यायचं? आणि बिग बॉसच्या घरामध्ये रहाणं खूप कठीण आहे आणि ते का कठीण आहे हे सगळं पुष्करला सांगणार आहे. खूप उत्तमरीत्या पुष्कर सईचे सांत्वन करताना दिसेल आणि तो कसा या घरामध्ये रहाण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगणार आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये अंताक्षरीचा आणि इतर खेळ रंगतात पण आता विनीतची इच्छा घरच्यांनी शेवटी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असून घरात चमचा- लिंबूचा खेळ रंगणार आहे. घरामध्ये आता वातावरण जरा गंभीर झाले असून लवकरच घरामधून कोण बाहेर जाईल याचा निर्णय होणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 6:18 pm

Web Title: big boss marathi upcoming day 6
Next Stories
1 बायकोसाठी विराट कोहलीने असे व्यक्त केले प्रेम
2 ट्विंकल खन्नाला विमानात डासांचा त्रास, बुडण्याऐवजी डेंग्यूने मरण्याचा धोका जास्त असल्याची खोचक प्रतिक्रिया
3 Photos: मिलिंद सोमण पुन्हा बोहल्यावर
Just Now!
X