27 February 2021

News Flash

Big Boss Marathi: घरात अजून एका कलाकाराची होणार ‘वाईल्ड कार्ड एण्ट्री’

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच त्यागराज खाडिलकर आणि शर्मिष्ठा राऊत यांची एण्ट्री झाली

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एकानंतर एक नवीन सदस्य जात आहेत. नवनवीन कलाकारांच्या येण्यामुळे प्रेक्षक आणि स्पर्धकांना दर आठवड्याला आश्चर्याचा धक्का मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच त्यागराज खाडिलकर आणि शर्मिष्ठा राऊत यांची एण्ट्री झाली. आता अजून एका सदस्याची बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एण्ट्री होणार आहे. आपल्या हजरजबाबी आणि स्पष्टवक्तेपणामुळे ज्यांना ओळखले जाते तसेच ज्यांच्या कलर्स मराठीवरील कार्यक्रमातील “पक्या भाई” या पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली असे नंदकिशोर चौघुले वाइल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रवेश घेणार आहेत.

नंदकिशोर बिग बॉस मराठीबद्दल बोलताना म्हणाला की, ‘या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताना माझी कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटीजी नसणार आहे. कारण या घरामध्ये त्याचा निभाव लागणार नाही. या घरामध्ये तुम्ही माणूस म्हणून कसे वागता, कसे रहाता यावर हा खेळ निर्धारित आहे. मला असं वाटत या घरामध्ये खऱ्या स्वभावावर टिकून रहावं आणि स्वत:ला तपासणं गरजेचं आहे.’

घरामध्ये जाताना कशाची भीती वाटते आहे असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला कशाचीही भीती वाटत नाही. कारण, लोकांमध्ये माझी प्रतिमा काय आहे याचा मी कधीच विचार केला नाही, मी सादर करत असलेल्या पात्राची प्रतिमा नेहमी जमली. पण, इथे स्वत: मीच असणार आहे. त्यामुळे आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचे, घरामध्ये टिकून रहायचे हेच माझे ध्येय असणार आहे.’

तुझा हजरजबाबी आणि स्पष्टवक्तेपणा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दिसेल का असे विचारल्यावर तो म्हणाला की, ‘नक्कीच दिसेल. माझ्या घरीसुध्दा वागताना मी कधीच मागून बोलत नाही किंवा तोंडदेखल वागत नाही. माझ्याबाबतीत असं कधीच घडलं नाही. त्यामुळे माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे माझ्याकडे लोकं खूप जपून बोलतात.’

घरातील तगडे स्पर्धक कोण वाटतात असे विचारल्यावर नंदकुमारने मेघा आणि सईचे नाव घेतले. तसेच अंतिम सोहळ्याची तो तयारी करूनच आलो असून मेघा, सई आणि स्वतःला तो टॉपमध्ये पाहतो असं स्पष्ट केलं. आता नंदकिशोर यांचा हजरजबाबी आणि स्पष्टवक्तेपणा कोणाला पटेल आणि कोणाला पटणार नाही हे पाहणे रंजक असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 4:26 pm

Web Title: big boss marathi wildcard entry marathi actor nandkumar chaughule
Next Stories
1 फार स्वस्त शाळेत शिकतोय पतौडी कुटुंबाचा छोटा नवाब
2 नऊ वर्षानंतर ‘ही’ जोडी पडद्यावर एकत्र झळकणार
3 एकीकडे अरबाजची कबुली तर दुसरीकडे मुन्नी होतेय बदनाम
Just Now!
X