News Flash

‘जान कुमारनं मराठीतून माफी मागायला हवी’; अर्शी खानने व्यक्त केला संताप

जान कुमार सानूकडून महाराष्ट्राची माफी; मनसेनं दिला होता २४ तासांचा अल्टीमेटम

‘जान कुमारनं मराठीतून माफी मागायला हवी’; अर्शी खानने व्यक्त केला संताप

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. “मराठी भाषेत माझाशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असं खळबळजन वक्तव्य त्याने केलं होतं. या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री अर्शी खान हिने प्रतिक्रिया दिली. जान कुमारने मराठीतून माफी का मागितली नाही? असा सवाल तिने केला आहे.

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केले न्यूड फोटो; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक

अर्शीने अलिकडेच एका मराठी म्युझिक अल्बमच्या प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यावेळी मराठी भाषेच कौतुक करत तिने जान कुमार सानूवर जोरदार टीका केली. ती म्हणाली, “मराठी एक खुप सुंदर भाषा आहे. मला मराठी चित्रपट पाहायला आणि गाणी ऐकायला मला खुप आवडतं. बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारही मराठीच तोंड भरुन कौतुक करतात. परंतु जान कुमारने मराठीचा केलेला अपमान पाहून खुप दु:ख झालं. तो एका नामांकित गायकाचा मुलगा आहे. त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती. असो त्याने माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने मराठी भाषेतच माफी मागायला हवी होती.”

अवश्य पाहा – हे १० चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका; कारण…

अवश्य पाहा – १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट

जान कुमार सानूने मागितली माफी

मराठीचा मुद्दा वादग्रस्त ठरल्यानंतर बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूला समज देण्यात आली. तसंच या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा आदर केला जात असून जान सानूनं केलेली चूक पुन्हा होऊ नये असंही बिग बॉसकडून सांगण्यात आलं. “मी काही दिवसांपूर्वी नकळत एक चूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,” अशा शब्दात त्याने सर्वांची माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 7:27 pm

Web Title: big boss season 14 jaan kumar sanu arshi khan apologize marathi controversy mppg 94
Next Stories
1 Video : टायगर-श्रद्धाच्या डान्सचा ‘हा’ व्हिडीओ एकदा पाहाच
2 प्रसिद्ध अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक
3 सिद्धार्थ मल्होत्राला कियारा करतेय डेट? अक्षय कुमारच्या इशाऱ्यावरून सुरू झाली चर्चा
Just Now!
X