News Flash

जान कुमारच्या आईनंही मागितली मराठी भाषिकांची माफी; म्हणाल्या, “माझ्या मुलाला…”

जान कुमार सानूकडून महाराष्ट्राची माफी; मनसेनं दिला होता २४ तासांचा अल्टीमेटम

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. “मराठी भाषेत माझाशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असं खळबळजन वक्तव्य त्याने केलं होतं. या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणावर जान कुमारची आई रीटा भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या मुलानं मराठी भाषेचा अपमान केला नाही. केवळ शोच्या टीआरपीसाठी हा मराठीचा मुद्दा उचलून धरला जातोय” असा दावा रीटा यांनी केला.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रीटा यांनी बिग बॉसमधील मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “जानने मराठी भाषेबद्दल जे वाक्य उच्चारलं त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावला जातोय. खरं तर जान मराठी भाषेवर नव्हे तर निक्की आणि राहुल यांच्यावर संतापला होता. तो कधीही मराठीचा अपमान करणार नाही. माझा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. माझ्या पतीचं संपूर्ण करिअर महाराष्ट्रातच घडलं आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्रीय मित्रमंडळींसोबत मराठीतच संभाषण करतो. मग माझ्या मुलाला मराठीचा राग का येईल? तरी देखील मी माझ्या मुलाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेची हात जोडून माफी मागते.”

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

यापूर्वी जान कुमार सानूने मागितली माफी

मराठीचा मुद्दा वादग्रस्त ठरल्यानंतर बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूला समज देण्यात आली. तसंच या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा आदर केला जात असून जान सानूनं केलेली चूक पुन्हा होऊ नये असंही बिग बॉसकडून सांगण्यात आलं. “मी काही दिवसांपूर्वी नकळत एक चूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,” अशा शब्दात त्याने सर्वांची माफी मागितली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 1:16 pm

Web Title: big boss season 14 jaan kumar sanu rita bhattacharya apologize marathi controversy mppg 94
Next Stories
1 ‘प्रियांकाने कायम मला…’; ‘फॅशन’च्या सेटवर अशी होती देसी गर्लची वागणूक
2 काजलने लावली गौतमच्या नावाची मेहंदी; पाहा फोटो
3 पायल घोषला करोना?; RPI प्रवेशादरम्यान आठवलेंच्या संपर्कात आल्याने क्वारंटाइन
Just Now!
X