कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला देण्यात येणा-या टास्कपैकी काल ‘अंडे का फंडा’ हा साप्ताहिक टास्क चांगलाच रंगल्याचं पहायला मिळालं. या टास्कमध्ये घरातील अन्य सदस्यांच्या नावाची अंडी जरी नष्ट झाली असली तरी सुशांत आणि आस्ताद यांच्या नावाचं अंड शाबूत राहिले. यामुळेच आता या आठवड्याच्या कॅप्टनसिसाठी या दोघामध्ये चुरस रंगणार आहे.
‘अंडे का फंडा’ या टास्कदरम्यान सुशांत आणि पुष्कर यांच्यामध्ये काही शाब्दिक वादही पहायला मिळाले मात्र घरातल्या अन्य सदस्यांनी या भांडणात हस्तक्षेप करत भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र घरामध्ये आता ख-या अर्थाने मजा येणार असून बिग बॉस कॅप्टनसीसाठीचे नवे कार्य घरातील सदस्यांवर आज सोपविणार आहेत. या कार्याचं नाव नाव ‘सत्कार मूर्ती’ असं असणार आहे.
विशेष म्हणजे या चुरशीमध्ये बिग बॉस कॅप्टनसीसाठीचे नवे कार्य घरातील सदस्यांवर आज सोपवणार आहेत. या कार्याचं नाव ‘सत्कार मूर्ती’ असं असणार आहे. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण होईल बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवी रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2018 7:18 pm