News Flash

पाच वर्षांनंतर सनी लिओनी पुन्हा दिसणार बिग बॉसच्या घरात

सनीने केलेला पोल डान्स अजूनही सर्वांच्या लक्षात आहे.

सनी बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून गेली होती.

पॉर्नविश्वातून बॉलीवूडकडे वळलेल्या सनी लिओनीने बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून भारतीय टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. बिग बॉसच्या पाचव्या पर्वात सनी लिओनी दिसली होती. या शोमध्ये झालेल्या तिच्या एण्ट्रीनंतर शोचा घसरता टीआरपी पुन्हा वर आला होता. सनीच्या वादग्रस्त भूतकाळाचा शोला बराच फायदा झालेला. शोची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी राहिलेल्या सनीने तेव्हा तिची एक खास जागा निर्माण केली होती. त्यावेळी सनीने केलेला पोल डान्स अजूनही सर्वांच्या लक्षात आहे.

नुकतीच, सनी बिग बॉसच्या घरात पाहुणी म्हणून गेली होती. त्यादरम्यान तिने घरातील सदस्यांना एक टास्क दिले. या टास्कअंतर्गत सर्व स्पर्धकांना एक असा व्हिडिओ तयार करायचा होता जो लगेच व्हायरल होईल. त्यावर लोपा, मोना, रोहन आणि मनूच्या टीमने पोल डान्स करण्याचा निर्णय घेतला.  मग मोनाने लोपाला पोल डान्स करण्यास सांगितले. लोपाचे शरीर लवचिक असल्यामुळे ती चांगला पोल डान्स करू शकते असे मोनाचे म्हणणे होते.  यावेळी मनू आणि रोहन समोर बसून तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होते. टास्कमध्ये सांगण्यात आल्यानुसार लोपाच्या पोल डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, लोपाने सनीच्या टक्कर पोल डान्स केला. तिच्या या पोल डान्सची तुलना सनीच्या पोल डान्सशी केली जातेय.

दरम्यान, पोल डान्सनंतर मोनाने स्वतः पोल डान्स करावयास हवा होता, असे मत बानीने किचनमध्ये असताना मोनासमोर मांडले. यात तुमचे शरीर कसेय हे महत्त्वाचे नाही असेही तिने म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 6:39 pm

Web Title: bigg boss 10 is lopamudra the next sunny leone of the bigg boss house
Next Stories
1 ‘बाहुबली २’ चित्रपटातील दृश्य लीक केल्याप्रकरणी एकाला अटक
2 VIDEO: रजनीकांतने राखी सावंतला म्हटले बॉलीवूडची क्वीन
3 ..यामुळे करिना-शाहिदमधील दुरावा संपला
Just Now!
X