News Flash

‘बिग बॉस १०’मध्ये वादग्रस्त पाकिस्तानी मॉडेल कंदीलची वर्णी लागू शकते!

विराटने अनुष्काला सोडून द्यावे अशी मागणी कंदीलने केली होती.

qandeel-virat‘सुलतान’ चित्रपटाचे शुटिंग आटोपून अभिनेता सलमान खान आता ‘बिग बॉस’च्या आगामी दहाव्या सत्राच्या तयारीत व्यग्र झाला आहे. यावेळच्या ‘बिग बॉस’मध्ये वादग्रस्त पाकिस्तानी मॉडेल दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. प्रसिध्द भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला प्रपोज करणारी पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करू शकते. क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी कंदीलचे नाव प्रकाशझोतात आले. परिणामी पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल म्हणून तिची ओळख निर्माण झाली. ‘टी२० वर्ल्डकप’दरम्यानच्या आपल्या विचित्र वक्तव्याने तिने मोठ्या प्रमाणावर प्रसिध्दी मिळवली. ‘वर्ल्ड टी-२०’ सामन्यात पाकिस्तानला भारताकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर विराटने अनुष्काला सोडून द्यावे, अशी मागणी कंदीलने केली होती. विराटने अनुष्काला सोडून देण्याची मागणी करणाऱ्या या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती, “विराट माझ्यासाठी तू अनुष्काला सोडून दे आणि माझा विचार कर.” अन्य एका व्हिडिओमध्ये तिने विराटला “आय लव्ह यू” म्हटले होते. अगोदर तिला शाहिद आफ्रिदी आवडत होता. ‘वर्ल्ड टी-२०’मध्ये शाहिदने चांगले प्रदर्शन केले तर आपण ‘स्ट्रिप डान्स’ करू असे तिने जाहीर केले होते. ही पाकिस्तानी मॉडेल सोशल मीडियावरील तिच्या चित्रविचित्र फोटोंसाठीदेखील प्रसिध्द आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी अलिकडेच तिच्याशी संपर्क साधल्याचे माध्यमांतील वृत्ताचा हवाला देत सांगितले जाते. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांसमोर आपण काही अटी ठेवल्या असून, त्यांची पूर्तता झाल्यास आपण शोमध्ये सहभागी होणार असल्याचे अलिकडेच तिने एका मासिकाला सांगितले. महत्वाचे म्हणजे ‘बिग बॉस’च्या यावेळच्या सत्रात सेलिब्रिटींबरोबर सामान्य जनतेलादेखील सहभागी होणाची संधी मिळणार आहे.

qandeel-01

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 6:18 pm

Web Title: bigg boss 10 pakistani model qandeel baloch to participate on salman khans show
टॅग : Salman Khan
Next Stories
1 पर्यावरण स्नेही सुयश टिळक
2 गायक बेनी दयालचा प्रेयसी कॅथरिनशी विवाह
3 हॉलीवूडमुळे जगातील स्थानिक चित्रपटसृष्टी धोक्यात- अमिताभ बच्चन
Just Now!
X