‘बिग बॉस १०’ चा प्रोमो शनिवारी प्रदर्शित झाला. बिग बॉस या रिअॅलिटी टिव्ही शोचे हे १० वे पर्व आहे. या शोच्या अनेक पर्वाचे सुत्रसंचालन सलमान खान याने केले आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान एका अंतराळवीराच्या पोशाखात दिसत आहे. त्याला अंतराळात दाखवण्यात आले आहे. यात तो मानवाच्या इतिहासाशी निगडीत काही गोष्टींवर बोलताना दिसत आहे. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस, अंड आधी की कोंबडी यांसारखे डायलॉग बोलताना तो दिसतो. यावेळी बिग बॉसच्या १० व्या पर्वात सर्वसामान्य लोकांनाही समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती आधीच्या प्रोमोमध्ये देण्यात आली होती. या प्रोमोला कलर्सचे सीईओ राज नायक यांनी ट्विट केले आहे. या १० व्या पर्वाची टॅग लाइनही जरा हटके आहे. ‘इंडिया इसे अपना ही घर समझो’ अशी या शोची टॅग लाइन आहे.
बिग बॉस हा शो नेहमीच त्यातल्या स्पर्धकांच्या भांडणामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहीला आहे. त्यामुळे यावेळी नेमकी कोणते वादग्रस्त स्पर्धक या बिग बॉसच्या घरात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
सलमान खानने आतापर्यंत बिग बॉसच्या नऊ पैकी पाच पर्वांचे सुत्रसंचालन केले आहे. प्रिंस नरुला हा स्पर्धक बिग बॉसच्या नवव्या पर्वाचा विजेता होता. याशिवाय बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने सलमानला माकड बोलून नुकताच वाद ओढवून घेतला होता.
पाहा हा बिग बॉसच्या १० व्या पर्वाचा प्रोमो-
Feel the fizz – Coming soon @BiggBoss with the #Sultan @BeingSalmanKhan #BB10 @iamappyfizz @oppomobileindia pic.twitter.com/uoVsFrHrpN
— Raj Nayak (@rajcheerfull) August 27, 2016
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 4:03 pm