News Flash

Bigg Boss 10: ‘बिग बॉस’च्या घरात चोरी करताना दिसले स्वामीजी

आपण खूप ज्ञानी आणि चांगले वक्ता असल्याचा स्वामींना भ्रम आहे.

स्वामी ओमजी महाराज

‘बिग बॉस’च्या १० व्या पर्वाला सुरुवात झाली असून, सुरुवातीपासूनच अनेक नवनवीन गोष्टींच्या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्याच भागात घरात प्रथम शिरणारे स्पर्धक स्वामी ओमजी महाराज यांनी आपल्या वाचाळपणाचा नमुना दाखविण्यास सुरुवात केली आहे. आपण खूप ज्ञानी आणि चांगले वक्ता असल्याचा स्वामींना भ्रम आहे. मात्र ‘बिग बॉस १०’चा सूत्रसंचालक अभिनेता सलमान खान आणि प्रेक्षक वाचाळ स्वामींच्या कारनाम्यांची मजा लूटत आहेत. घरातील स्त्रियांची प्रशंसा करण्यापासून ते स्पर्धकांना ज्ञान देणारे स्वामीजी बिग बॉसच्या घरात आपले स्थान निर्माण करण्यासाठी एकही संधी दवडत नाहीएत. नुकतेच स्वामीजी चोरी करताना कॅमे-यात कैद झाले. या संदर्भातील वृत्त मिस मालिनी या बॉलीवूड वेब पोर्टलने दिले आहे.

मिस मालिनी या वेब पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक झोपले असताना पहाटेच स्वामी ओमजी बाथरुमला गेले होते. त्यावेळी त्यांचे लक्ष एका डेओड्रन्टच्या बाटलीकडे गेले. त्यानंतर त्यांनी तो स्प्रे आपल्या अंगावर मारला. बहुदा स्वामी ओमजी यांना तो डिओड्रन्ट जास्तच आवडला असावा. त्यामुळेच त्यानंतर त्यांनी ती बाटली आपल्या हातातील टॉवेलमध्ये लपवली.
दरम्यान, बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता आणि या शोचा सूत्रसंचालक सलमान खानला आपण जगातला सर्वात मोठा स्टार बनविणार असल्याचा पण करणाऱ्या स्वामींनी पुढील वर्षी सलमानचे लग्नदेखील लावून देणार असल्याचे विधान शोदरम्यान केले होते. सलमानच्या मनासारख्या मुलीशीच त्याचे लग्न लावून देणार असल्याचा दावादेखील त्यांनी केलेला. त्यावर स्वामींनी जणू काही आपल्यासाठी मुलगी पाहून ठेवली आहे, अशा शैलीत ते बोलत असून, आपले लग्न लावून देण्यासाठी स्वामींनी लवकर ‘बिग बॉस’च्या घराबाहेर यावे, अशी आपली इच्छा असल्याचे म्हणत सलमानने त्यांची खिल्ली उडवली होती. आपण एक सन्यासी आणि तांत्रिक असल्याचे स्वामी सांगतात. विश्व शांतीसाठी काम करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ‘बिग बॉस’च्या माध्यमातून संपूर्ण विश्वात शांती प्रस्थापित करून राम राज्य प्रस्थापित करण्याची इच्छा असल्याचे ते सांगतात. मोठ्या उत्साहात ‘बिग बॉस’च्या मंचावर अवतरलेल्या स्वामींनी मंचावर येताच सलमानलादेखील तंत्रविद्येचे ज्ञान पाजले होते. इतकेच नाही तर स्वामीजी यांनी प्रियांका जग्गाच्या फिगरचेही कौतुक केले होते. ते म्हणालेले की, ‘तू स्वतःचे शरीर इतरे सुदृढ ठेवले आहेस की पहिल्यांदा पाहताना वाटतच नाहीस की तू दोन मुलांची आई आहेस.’ इतकेच नाही तर त्यांनी तिला पद्मासनमध्ये बसण्याचा सल्लाही दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:14 pm

Web Title: bigg boss 10 swami ji is stealing from the bigg boss house
Next Stories
1 ‘पान बहार तंबाखू उत्पादन असल्याचे माहित नव्हते’
2 वैदर्भीय रंगकर्मीची टीव्ही मालिकेत दमदार एंट्री
3 सोनाली आणि संदेश कुलकर्णी सोबत रंगला भाऊबीजचा खास भाग
Just Now!
X