18 October 2018

News Flash

Big Boss 11- आकाशने बळजबरीने शिल्पा शिंदेचे घेतले चुंबन, व्हिडिओ व्हायरल

त्याच्या अशा वागण्यामुळे शिल्पाचा मूड एकदम बदलतो

शिल्पा शिंदे आणि आकाश ददलानी

बिग बॉसच्या घरातून दररोज काही ना काही सनसनाटी प्रसंग घडत असतात. त्यामुळेच या मालिकेला मोठ्याप्रमाणावर टीआरपी मिळतो. या घरात आज एकमेकांचे चांगले मित्र असणाऱ्या व्यक्ती दुसऱ्याच दिवशी एकमेकांच्या कट्टर शत्रूही होऊ शकतात. आता आकाश ददलानी आणि शिल्पा शिंदेचेच पाहा ना… घरात सर्वात जास्त विक्षिप्त कोण असेल तर तो आकाश ददलानी आहे.

काही दिवसांपूर्वी आकाशने अर्शीला अंगाला लोशन लावून संपूर्ण घरात टॉवेलवर फिरण्यास सांगितले होते. अशा वादग्रस्त वक्त्तव्यांमुळे तो अनेकदा अडचणीतही आला होता. मात्र, आता एका नव्या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आकाशची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. शिल्पा शिंदेच्या फॅन्स क्लबने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो बळजबरीने शिल्पा शिंदेला किस करण्याचा प्रयत्न करतोय.

या व्हिडिओत शिल्पा आणि पुनीश एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. शिल्पाचा मूड तोपर्यंत फार आनंदी असतो. पण तितक्यात आकाश तिकडे येतो आणि जबरदस्ती गालावर कीस करतो. त्याच्या अशा वागण्यामुळे शिल्पाचा मूड एकदम बदलतो. असे जर पुन्हा झाले तर ती त्याला कानशिलात लगावेल, अशी ताकीदही ती त्याला देते. तेव्हाही आकाश तिला उद्धटपणे तुला जे करायचंय ते करं, अस म्हणताना दिसतो.

त्यानंतर शिल्पा तिथून निघून जात असताना आकाश तिचा हात पकडतो आणि शिल्पाची माफी मागतो. त्याक्षणी शिल्पाने त्याला माफही केले. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिल्पाच्या चाहत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सलमान खानने आकाशवर काही कारवाई करावी, असे या चाहत्यांनी सांगितले आहे. यापूर्वी बिग बॉसची स्पर्धक लुसिंडा निकोलसने तिलाही आकाशसमोर वावरताना संकोचल्यासारखे वाटायचे अशी कबुली दिली होती.

First Published on December 7, 2017 4:42 pm

Web Title: bigg boss 11 akash dadlani kissed shilpa shinde without her consent in front of puneesh sharma