18 October 2018

News Flash

Bigg Boss 11: हिना खानच्या बाजूने ट्विट करण्यासाठी तिच्या चाहत्यांना पैसे दिले जातात?

मतं मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे

हिना खान

तुम्हाला ‘नच बलिए रिअॅलिटी शो’ आठवतोय का? या शोमध्ये ज्याप्रमाणे सनाया इराणी आणि मोहित सेहगल या जोडीनं मतं मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता, त्याच पद्धतीचा काहीसा वापर आता बिग बॉस स्पर्धक हिना खानचे चाहते करताना दिसत आहे. हिनाचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आकर्षित करण्याचे आणि तिच्यासाठी जास्तीत जास्त मत देण्याचे फंडे वापरताना दिसते.

त्याचे झाले असे की, काहींना हिनाच्या नावावरुन ई-मेल येत असून तिलाच जास्तीत जास्त मत देण्याची मागणी या ई-मेल द्वारे केली जात आहे. एका ट्विटर युजरने यासंदर्भातील एक स्क्रिन शॉट सोशल मीडियावर शेअर केला असून हिनाचे चाहते कशा पद्धतीने तिला मतं मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत ते दाखवून दिले. या मेलमध्ये हिनाला मदत करुन शिल्पाला लवकरात लवकर बाद करण्याचा मेसेज देण्यात आला आहे. आधीच प्रेक्षकांचे हिनाबाबतचे मत फार काही चांगले नसताना आता अशापद्धतीचे ई-मेल यायला सुरूवात झाल्यामुळे येत्या काळात हिना ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहील का हा प्रश्नच उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी हिनाने प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वरला तिरळी म्हटले होते. यासंबंधीत एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर टीव्ही जगतातील अनेक अभिनेत्रींनी तिला सोशल मीडियावर चांगलेच सुनावले होते. तसेच या व्हिडिओमध्ये गौहर खानच्या प्रसिद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. हिना म्हणाली होती की, गौहर खानचे फॉलोअर्स माझ्यापेक्षा कमी आहेत. माझ्या अर्ध्याहून अर्धेही नाहीत. यानंतर तिने साक्षीला तिरळी म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावर फक्त गौहर खानच नाही तर काम्या पंजाबी, उर्वशी ढोलकिया आणि किश्वर मर्चंट यांनीही हिनाला चांगलेच सुनावले.

First Published on December 6, 2017 1:27 am

Web Title: bigg boss 11 are hina khans fans being paid in order to tweet in her favour