News Flash

‘या’ क्रिकेटरला भेटायला दुबईला गेली होती अर्शी खान, गहना वशिष्ठचा धक्कादायक खुलासा

या फोटोचा वापर भविष्यात ती तिच्या प्रसिद्धीसाठी करणार होती

सध्या ‘बिग बॉस’च्या घरात अर्शी खानच्याच नावाची चर्चा आहे. पण ती घरात जेवढा गोंधळ घालतेय तेवढाच गोंधळ तिच्यामुळे बाहेरही होत आहे. मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ अर्शीसंदर्भात रोज नवनवीन खुलासे करत आहे. ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अर्शीने पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आमिरशी जबरदस्ती नातं जोडण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्या या प्रयत्नांना फारसे यश आले नाही.

गहनाच्या म्हणण्यानुसार, आमिरला भेटण्यासाठी अर्शी दुबईलाही गेली होती. आमिर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या लॉबीमध्ये ती चक्क ६ तास त्याची वाट पाहत थांबली. पण तरीही आमिरने तिची भेट घेतली नाही. आमिरने तिला भेटण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. एवढंच नाही तर जेव्हा तो हॉटेलमधून बाहेर पडत होता तेव्हा त्याने अर्शीला ओळखही दाखवली नाही.

एवढेच बोलून गहना थांबली नाही तर ती पुढे म्हणाली की, अर्शी दुबईला आमिरसोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ घ्यायला गेली होती. जेणेकरुन या फोटोचा वापर भविष्यात ती तिच्या प्रसिद्धीसाठी करणार होती. पण आमिरने तिच्याकडे पाहिलेही नाही. त्यानंतर अर्शी क्रिकेटर आमिरला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. गहनाने दावा केला की, ही अफवा अर्शीचा जनसंपर्क अधिकारी फ्लिन रेमेडियोजनेच जाणीवपूर्वक पसरवली होती.

तसेच बिग बॉसमध्ये अर्शीचा भूतकाळ सर्वांसमोर आणल्याबद्दल फ्लिनने प्रियांका शर्माविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण आता असेही म्हटले जात आहे की, अर्शीविरोधात विवादात्मक वक्तव्य केल्याबदद्ल गहना वशिष्ठविरोधातही तो एक कोटी रुपयांचा मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे. त्यामुळे आता अर्शी आणि गहनाचे हे भांडण कुठपर्यंत जातंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 2:26 pm

Web Title: bigg boss 11 arshi khan gehana vasisth pakistani cricketer mohammad amir
Next Stories
1 ‘बिग बॉस ११’मध्ये लवकरच कपिल शर्माची एण्ट्री
2 ‘पहरेदार पिया की’ची टीम नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला
3 TOP 10 NEWS : ‘चला हवा येऊ द्या’च्या शेवटच्या भागापासून ‘भागमती’च्या रुपातील अनुष्कापर्यंत सर्व काही एका क्लिकवर
Just Now!
X