21 September 2020

News Flash

Bigg Boss 11: हितेनने विश्वासघात केल्यामुळे अर्शीचा पारा चढला

हितेनने बाहेर जाऊन इतक स्पर्धकांना आपण अर्शीची निवड केल्याचे सांगितले

हितेन आणि अर्शी

कलर्स चॅनलचा सध्याचा नंबर एकचा रिअॅलिटी शो बिग बॉस ११ मध्ये अनेक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळत आहेत. इतके दिवस हितेन तेजवानीशी फ्लर्ट करणाऱ्या अर्शी खानने रविवारी त्याची चांगलीच कान उघडणी केली. अर्थात त्याचे कारणही तसेच होते. या कार्यक्रमात शिल्पा शिंदे आणि अर्शी खान यापैकी एकीला वाचवण्याची वेळ आल्यास काय करणार, असे विचारल्यानंतर हितेनने शिल्पा शिंदेची निवड केली होती. मात्र, हितेनने बाहेर जाऊन इतक स्पर्धकांना आपण अर्शीची निवड केल्याचे सांगितले होते.

त्यानंतर एका प्रेक्षकाने केलेल्या फोन कॉलमुळे हितेनचे बिंग फुटले होते. त्याने हितेनला प्रश्न विचारला की, जर तुम्ही शिल्पा शिंदेला नॉमिनेशनपासून वाचवले तर बाहेर येऊन अर्शीला वाचवले असे खोटे का सांगितले? हे ऐकताच अर्शी आणि इतर स्पर्धक थक्क झाले. यावर उत्तर देताना हितेन म्हणाला की, मला ज्यांना सांगावसं वाटलं त्यांना मी सांगितलं. मी जेव्हा कनफेशन रूमच्या बाहेर पडलो तेव्हा सर्वांनी मला अर्शीला वाचवलंस ना? असा प्रश्न विचारला. यावर मी फक्त हो असं उत्तर दिलं.

साहजिकच अर्शी खान हितेनवर प्रचंड रागावली. माझा तुझ्यावरचा विश्वास उडाल्याचे तिने सर्वांदेखत हितेनला सांगितले. त्यामुळे आगामी आठवड्यांमध्ये हितेन आणि अर्शीमध्ये कोणते नवीन वाद निर्माण होतात ते पाहावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 5:51 pm

Web Title: bigg boss 11 arshi khan got angry with hiten tejwani said he has broken her trust
Next Stories
1 फोन नंबर मागणाऱ्या चाहत्याला शाहरुख म्हणाला…
2 Padman new poster: ‘ही’ अनोखी क्रांती घडवण्यासाठी अक्षय सज्ज
3 BLOG : अभिनयातील अनभिषिक्त सम्राट दिलीप कुमार!
Just Now!
X