News Flash

हिना खान बॉलिवूडच्या वाटेवर?

हिनाला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं आहे

चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हे नक्कीच माझ्या करिअरला कलाटणी देणारी गोष्ट असेल म्हणूनच मी या संधीच्या प्रतिक्षेत आहे असं ती म्हणाली.

गेली अनेक वर्षे हिंदी मालिकेतून झळकलेली ‘आदर्श सून’ हिना खान आता बॉलिवूडच्या वाटेवर असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ मालिकेतून ती घराघरात पोहोचली. एरव्ही पडद्यावर आदर्श सूनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या हिनाचं वेगळंच रुप ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळालं. या शोमध्ये विजयाची प्रबळ दावेदार असणाऱ्या हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिनं आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. पण आता या सगळ्यांतून बाहेर पडत हिनाला बॉलिवूडमध्ये करिअर करायचं आहे.

‘गेली आठ वर्षे मी मालिकेत आदर्श सूनेची भूमिका करत आहेत त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याविषयी एक प्रतिमा तयार झाली आहे.’ असं आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली. या सगळ्यातून बाहेर येऊन एक चांगली भूमिका आपल्याला करायची असल्याची इच्छादेखील तिनं यावेळी व्यक्त केली. ‘मालिका किंवा चित्रपट अशा कोणत्याही माध्यमात चांगली भूमिका मला करायची आहे आणि अशा भूमिकेच्या मी शोधात आहे. काही दिवसांपासून मी वेगवेगळ्या स्क्रिप्ट वाचत आहे. जर चांगली कथा असेल तर मी नक्कीच चित्रपटाचा विचार करेन असं तिनं म्हटलं आहे.

चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हे नक्कीच माझ्या करिअरला कलाटणी देणारी गोष्ट असेल म्हणूनच मी या संधीच्या प्रतिक्षेत आहे असं ती म्हणाली. नुकतीच छोट्या पडद्यावरची ही ‘आदर्श सून’ लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 7:46 pm

Web Title: bigg boss 11 contestant hina khan all set sing flim
Next Stories
1 ‘अय्यारी’ला संरक्षण मंत्रालयाचा आक्षेप
2 Video: ‘बिग बीं’चा अलाहाबादी अंदाज पाहिला का?
3 या ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदितीला मिळाली खिल्जीच्या पत्नीची भूमिका
Just Now!
X