X

Big Boss 11- शिल्पा-विकासमधील भांडण मारामारीपर्यंत

हिना खान आणि अर्शी खान यांचे भांडणही मारामारीपर्यंत गेले

‘बिग बॉस ११’चे घर म्हणजे सध्या लाव्हारसाच्या उद्रेक जिथून होतो ते ठिकाणासारखे झाले आहे. इथे प्रत्येक दिवशी एक नवा वाद होतो आणि त्या वादावर संपूर्ण घर भांडायला लागतं. एकीकडे विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यांचे भांडण हे फक्त बाचाबाचीपर्यंत न राहता मारामारीपर्यंत गेले होते. तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील संस्कारी सून हिना खानचाही मूळ स्वभाव आता सर्वांसमोर येत आहे. त्यामुळे शुक्रवारी एलिमिनेशन राऊंडला नक्की काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विकास आणि शिल्पा यांच्यात फार पूर्वीपासून भांडण आहे. त्यांचे भांडण आता बिग बॉसच्या घरातही स्पष्टपणे दिसून येते. आज प्रदर्शित होणाऱ्या भागात हे दोघेही एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसतील. बिग बॉसच्या टीमने एक प्रोमो प्रदर्शित केला या प्रोमोमध्ये दोघांच्या भांडण टोकाला गेल्याचे दिसते. तर हिना खान आणि अर्शी खान यांचे भांडणही मारामारीपर्यंत गेले.

शोच्या तिसऱ्या दिवशी सपना चौधरी आणि ज्योती कुमार यांच्यामध्येही भांडण झाले होते. ज्यानंतर सपनाने शो सोडण्याचे ठरवले होते. सपनाच्या मते, ज्योती तिच्यासोबत उद्धटपणे वागली. ती ज्योतीची वागणूक सहन करु शकत नाही. घरात सपनाव्यतिरिक्त इतर काही सदस्यांनाही ज्योतीचे वागणे पटत नाही.

हसीना पारकरचा जावई असे खोटे सांगून घरात गेलेला जुबैर खानला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येऊ शकतो. त्याच्या वागणुकीनेही घरातले कोणीच आनंदी नाही. ‘मिड-डे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार हसीना पारकर सिनेमाचा सह-निर्माता आणि दाऊदच्या कुटुंबातील एक सदस्य समीर अंतुलेने जुबैर हा आमच्या घरातील सदस्य नसल्याचे स्पष्ट केले. तो दाऊदचे नाव घेऊन प्रसिद्ध होऊ पाहत असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे समीरने सांगितले.

वाचा / प्रतिक्रिया द्या
Outbrain