News Flash

Big Boss 11- टॅरो कार्ड रिडरची भविष्यवाणी खरी ठरली तर हा स्पर्धक होईल विजेता

संपूर्ण पर्वात शिल्पा शिंदेच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे

बिग बॉस ११ च्या अंतिम फेरीला आता काही तासच उरले आहेत. ११ व्या पर्वाचा विजेता कोण असणार या संदर्भात अनेक तर्क लढवले जात आहेत. या रिअॅलिटी शोची सुरूवात १९ स्पर्धकांनी झाली. आता फक्त चार स्पर्धकच उरले आहेत. लवकरच विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान आणि पुनीश शर्मा यांच्यातील एक ११ व्या पर्वाचा विजेता होईल. रविवारी सलमान अंतिम विजेत्याचे नाव घोषित करतील.

संपूर्ण पर्वात शिल्पा शिंदेच प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या पर्वाची विजेतीही तीच होईल असे अनेकांचे म्हणणे आहे. पण टॅरो कार्ड रीडर मनिषा सिंहच्या मते, शिल्पा नाही तर हिना खान या पर्वाची विजेती होईल. मनिषाने भविष्यवाणी केली की, ‘हिनाच हे पर्व जिंकेल असं मला वाटत आहे. तिच्याकडे यश येणार आहे आणि ती या सन्मानासाठी पात्र आहे. तिला भविष्यात अनेक गोष्टी मिळणार आहेत.’ ती पुढे म्हणाली की, ‘बिग बॉस ११ मध्ये हिनाचा प्रवास फारच वादग्रस्त होता. छोट्या पडद्यावरील कलाकारांना ती फारशी आवडत नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. ती या शोमध्ये तिच्या हिंम्मतीवर टिकली आहे. तीच हा शो जिंकेल असे मला वाटते.’

हिना खानने स्टार प्लसच्या ये रिश्ता क्या कहलाता हैं या मालिकेत अक्षरा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेमुळे ती एका रात्रीत स्टार झाली. शोदरम्यान तिने केलेली व्यक्तव्य चर्चेचा विषय ठरली होती. तिच्या याच विधानांमुळे तिची प्रतीमा चांगली होण्यापेक्षा खराबच झाली होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये तिची जुनीच प्रतीमा राहिली आहे की नाही हे उद्या रविवारी कळेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2018 5:35 pm

Web Title: bigg boss 11 hina khan to win the show believes tarot and clairvoyant reader shilpa shinde vikas gupta puneesh sharma
Next Stories
1 …म्हणून वीरप्पनला मारण्यासाठी सुपरस्टार रजनीकांतकडे मागितली होती मदत
2 ‘पिफ’मध्ये निवड झालेल्या ‘व्हिडिओ पार्लर’ चित्रपटाचा टीजर
3 कुठलीही कलाकृती आपलं नशीब घेऊन येत असते- तेजस्विनी पंडित
Just Now!
X