News Flash

भजन गातो म्हणून मी काही साधू-संत नाही- अनुप जलोटा

अनुप जलोटा व जसलीन यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

अनुप जलोटा, जसलीन मथारू

टेलिव्हिजनवरील सर्वांत वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. या रिअॅलिटी शोचं बारावं पर्व नुकतंच सुरू झालं असून ग्रँड प्रिमिअरमध्ये स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना करण्यात आली. यंदा ‘विचित्र जोडी’ अशी थीम असल्याने स्पर्धक एका जोडीदारासह या शोमध्ये सहभागी झाले. प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा भजन सम्राट अनुप जलोटा यांनी गर्लफ्रेंड जसलीन मथारू हिच्यासोबत शोमध्ये प्रवेश केला. जसलीन जलोटा यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे. या दोघांनी ‘बिग बॉस १२’च्या सेटवर प्रेमाची कबुली दिली. अनुप जलोटा व जसलीन यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेकांनी जलोटा यांना ट्रोलदेखील केलं. पण मी भजन गातो म्हणजे मी काही साधूसंत नाही असं जलोटा यांनी म्हटलं.

‘लोकांना वाटत असेल की मी भजन गातो म्हणजे साधूसंत असेन, पण असं अजिबात नाही. पण मी जीवनाचा पुरेपूर आनंद उपभोगणारा, मजेत आयुष्य जगणारा आहे आणि याची प्रचिती तुम्हाला ‘बिग बॉस १२’ पाहून येईल,’ असं त्यांनी म्हटलं. ‘भजन सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा हे ६५ वर्षांचे असून जसलीन २८ वर्षांची आहे. या दोघांना त्यांच्या नात्यावरून ट्रोलचा सामना करावा लागत आहे.

वाचा : रणबीरविषयी आलियाची आई म्हणते..

‘बिग बॉस १२’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी जलोटा यांनी ‘मुंबई मिरर’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘अन्य स्पर्धकांच्या तुलनेत मी वयाने खूप मोठा आहे. परंतु, विचारांनी त्यांच्यापेक्षा तरुण आहे. लोकांना वाटतं की मी भजन गातो म्हणजे कोणी साधूसंत असेन. पण असं अजिबात नाही. मी आनंद लुटत, मज्जा करत जीवन जगतो आणि हे तुम्हाला बिग बॉसमध्ये दिसेल.’

अनुप जलोटा आणि जसलीन गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यापूर्वी जलोटा यांचा तीन वेळा संसार मोडला. त्यांच्या पहिल्या दोन पत्नींशी घटस्फोट तर तिसऱ्या पत्नीचं दीर्घकालीन आजाराने निधन झालं. जसलीनसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं माझ्या आई- वडिलांना माहित नाही, अशी कबुलीही त्यांनी एका मुलाखतीत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 5:17 pm

Web Title: bigg boss 12 anup jalota says singing bhajans does not mean he is saint he enjoys life to the fullest
Next Stories
1 VIDEO : चाहत्यांच्या गराड्यात अडकला बी- टाऊनचा ‘बॉडीगार्ड’
2 रणबीरविषयी आलियाची आई म्हणते..
3 Video : …जेव्हा जस्लीन सावरते अनुप जलोटा यांची बाजू
Just Now!
X